घरदेश-विदेशसोशल मीडियाद्वारे कोर्टाबाहेर समांतर कोर्ट चालवू नका

सोशल मीडियाद्वारे कोर्टाबाहेर समांतर कोर्ट चालवू नका

Subscribe

पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले

याचिकाकर्ते माध्यमांसमोर या प्रकरणी वक्तव्य करत आहेत. सर्व युक्तिवाद न्यायालयात व्हायला हवेत. जर याचिकाकर्त्यांना सोशल मीडियावर वादविवाद करायचे असतील तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे. पण जर ते कोर्टात आले असतील तर त्यांनी कोर्टात युक्तिवाद करावा. त्यांचा कोर्टावर विश्वास असावा. काहीही असो, कोर्टात सांगा, सोशल मीडियाद्वारे कोर्टाबाहेर समांतर कोर्ट चालवू नका, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी मंगळवारी पेगॅससप्रकरणी याचिका करणार्‍यांना खडसावले. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवार, १६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सर्वांना या प्रकरणात आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना सुनावणीवेळी म्हणाले. कुणीही मर्यादांचे उल्लंघन करू नका. या प्रकरणी सर्वांना संधी दिली जाईल. मात्र, सोशल मीडियावर समांतर चर्चेपासून दूर राहा, अशी ताकीदही कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिली. जे काही सांगायचं आहे, ते कोर्टात सांगा. तुम्ही एकदा कोर्टात आला तर तिथेच युक्तीवाद करा, असे निरीक्षण नोंदवत कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले. सॉलिसिटर जनरलनी आणखी वेळ मागितल्याने कोर्टाने सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.

- Advertisement -

पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. दुसरीकडे पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरल्याने संसदेत गदारोळ सुरूच आहे. जवळपास २१ दिवस संसदेचे कामकाज विस्कळीत होते. विरोधी पक्षांनी संसदेच्या संयुक्त समितीद्वारे या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने केंद्राला या प्रकरणी नोटीस जारी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -