घरदेश-विदेशदुबईच्या बस अपघातात १२ भारतीयांचा मृत्यू

दुबईच्या बस अपघातात १२ भारतीयांचा मृत्यू

Subscribe

दुबईमध्ये एका बसला झालेल्या अपघातात बारा भारतीयांसह १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दुबईमधील मस्कत – ओमान मार्गावर एका बसला झालेल्या अपघातात बारा भारतीयांसह १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुबईतील हिंदुस्थानी दुतावासाने याबाबत अध्कृत माहिती दिली आहे. या अपघातात सहा हिंदुस्थानी जखमी झाले असून त्याच्यांवर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

मस्कत दुबई मार्गावरील शेख मोहम्मद बिन झायद रोडवर गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ईद निमित्त या बसमधील सर्वजण फिरायला गेले होते. तेथून परतत असताना शेख मोहम्मद बिन झायद रोडवर हा अपघात झाला आहे. या अपघातात राजागोपालन, फिरोज खान पठाण, रेश्मा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन अराक्कावीत्तील, किरण जॉनी, वासुदेव, तिलाक्रम जवाहार ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आम्हाला कळविण्यास फार दुख होत आहे की, दुबईतील बस अपघातात आठ हिंदुस्थानींचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानी दूतावास मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसोबत संपर्कात आहे.’ असे हिंदुस्थानी दूतावासाकडून ट्विट करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -