घरदेश-विदेशपंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली

पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली

Subscribe

१६ फेब्रुवारी रोजी श्री गुरू रविदास यांची जयंती असल्यामुळे पंजाबी लोकं वाराणसीला जातात. याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलल्याची मागणी पंजाबमधील अनेक नेत्यांनी केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी निवडणूक आयोगाला या संबंधीत पत्र लिहिले होते.

देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली असतानाच निवडणूक आयोगाने अचानक पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली आहे. पंजाबची विधानसभा निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, आता ही निवडणूक १४ फेब्रवारी ऐवजी २० फेब्रुवारीला होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

१६ फेब्रुवारी रोजी श्री गुरू रविदास यांची जयंती असल्यामुळे पंजाबी लोकं वाराणसीला जातात. याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलल्याची मागणी पंजाबमधील अनेक नेत्यांनी केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी निवडणूक आयोगाला या संबंधीत पत्र लिहिले होते. या पत्रात मुख्यमंत्री चन्नी यांनी निवडणुकीची तारीख ६ दिवसांनी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. तसेच भाजपनेही रविवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांना पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

‘पंजाबमध्ये जवळपास ३२ टक्के अनुसूचित जातीचे नागरिक आहेत. १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान बहुतांश लोक युपीला जातील. यामुळे तो निवडणुकीत मतदान करू शकणार नाही, असे या नेत्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच ही मागणी मान्य करत विधानसभा निवडणूक एक आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

त्याआधी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याच्या मागणीवर निवडणूक आयोगाने काँग्रेस, भाजप आणि पंजाब लोक काँग्रेसची बैठक घेतली होती. बैठकीत निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि इतर पक्षांची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी मान्य केली. त्यानंतरच निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -