घरदेश-विदेशराज्यसभेच्या 10 जागांसाठी होणार जुलैमध्ये मतदान, निवडणूक आयोगाने दिली माहिती

राज्यसभेच्या 10 जागांसाठी होणार जुलैमध्ये मतदान, निवडणूक आयोगाने दिली माहिती

Subscribe

राज्यसभेतील 10 खासदारांचा कार्यकाळ आता लवकरच संपणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेतील 10 खासदारांचा कार्यकाळ आता लवकरच संपणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासहित 10 खासदारांचा कार्यकाळ आता पुर्ण होणार आहे. पण एस. जयशंकर यांची फेरनिवड करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्यात 13 आणि 24 जुलैला मतदान घेण्यात येणार असून 24 जुलैला मतमोजणी करण्यात येणार आहे. (Election for 10 Rajya Sabha seats will be held in July, Election Commission informed)

हेही वाचा – वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला देणार स्वा. सावरकरांचे नाव, वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

- Advertisement -

गोवा, पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यातील एकून 10 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये गोव्यातील राज्यसभेच्या 1 जागेसाठी, पश्चिम बंगालमधील 6 जागांसाठी आणि गुजरातमधील 3 जागांसाठी या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. गुजरातमधून राज्यसभेच्या खासदार पदावर असलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, जुगलसिंग माथुर्जी आणि दिनेश जेमलभाई यांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे.

गोव्यातील विनय तेंडुलकर यांचा कार्यकाळ 28 जुलै रोजी संपत आहे, तर पश्चिम बंगालमधील डेरेक ओब्रायन, डोला सेन, प्रदीप भट्टाचार्य, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंदू शेखर रे यांचा कार्यकाळ सुद्धा 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. पश्चिम बंगालमध्ये लुझिन्हो जोआकिम फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरही निवडणूक होणार आहे. या जागेची मुदत 2 एप्रिल 2026 पर्यंत असेल.

- Advertisement -

गुजरातमध्ये राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. त्यापैकी आठ जागा भाजपकडे तर तीन जागा काँग्रेसकडे आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, दिनेश अनावडिया आणि जुगल ठाकोर (लोखंडवाला) यांचा गुजरातमधून राज्यसभेतील कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. भाजप परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना राज्यसभेवर पाठवू शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -