घरमहाराष्ट्रवर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव, वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला वीर सावरकरांचे नाव, वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Subscribe

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी नाव्हा शेवाला अटल सेतू नाव देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.

मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी नाव्हा शेवाला अटल सेतू नाव देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. आज (ता. 28 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेत आणखी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावरून वाद पेटला होता. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांकडून याबाबत निर्णय घेण्यात असल्याचे संकेत देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (Versova-Bandra Sea Bridge will be given to Swa. Savarkar’s name Cabinet meeting decision)

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाले, “ताई, तू लढत राहा…”

- Advertisement -

तसेच राज्यात 700 ठिकाणी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाणार असून यासाठी 210 कोटी रुपयांची मान्यता देण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. याशिवाय 9 ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी 4 हजार 365 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

आजच्या मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णय

  • वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
    (सार्वजनिक बांधकाम)
  • एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव
    (नगर विकास विभाग)
  • राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. 210 कोटीस मान्यता
    (सार्वजनिक आरोग्य विभाग )
  • भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ
    (जलसंपदा विभाग)
  •  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. 2 कोटी कार्ड्स वाटणार. आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
    (सार्वजनिक आरोग्य विभाग)
  •  संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
    (सामाजिक न्याय्य व विशेष सहाय विभाग)
  • आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.
    करोडो कामगारांना लाभ मिळणार
    (कामगार विभाग)
  •  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)
  • मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.
    ( सामान्य प्रशासन विभाग)
  • पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
    (जलसंपदा विभाग)
  • मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड देण्याचा निर्णय
    (महसूल विभाग)
  •  भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
    (महसूल विभाग)

• मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
(विधी व न्याय विभाग)

- Advertisement -

• राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

• सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
(वित्त विभाग)

• बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
(गृहनिर्माण विभाग)

  • जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 3552 कोटी खर्चास मान्यता
    (परिवहन विभाग)
  • राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. 4365 कोटी खर्चास मान्यता
    ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
  •  बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
    (कृषि विभाग)

• दीनदयाळ अंत्योदय योजना आता 143 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार
(नगरविकास विभाग)

  • दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. 12 लाख विद्यार्थ्यांना लाभ
    ( शालेय शिक्षण)
  • देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
    ( मृद व जलसंधारण)
  • चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
    ( कृषी विभाग)
  •  सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
    (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
  • गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
    ( जलसंपदा विभाग)
  • ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
    (ग्रामविकास विभाग)
  • पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
    ( मत्स्य व्यवसाय विभाग)
  • पर्यटन उपविभागासाठी उप सचिव
    (पर्यटन विभाग)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -