घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार, एक जवान शहीद

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या तीन ठिकाणी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहेत तर एक जवान शहीद झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दरम्यान दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. गाजीगुंड भागामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये एक जवान शहीद झाले आहे. गुरुवारी सकाळी घाटीमध्ये सकाळपासूनच दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे.

- Advertisement -

दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या गाजीगुंडमध्ये झालेल्या चकमकी दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये एक जवान शहीद झाले आहेत. याआधी अनंतनागजवळील शाहबादमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. चकमकीनंतर या परिसरामध्ये इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

तीन ठिकाणी चकमक सुरु

जम्मू-काश्मीरमध्ये सकाळपासून तीन ठिकाणी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. श्रीनगर शहराजवळील नूरबाग परिसराला दोन दहशतवाद्यांनी घेराव घातला आहे. दहशतवादी आणि जवान यांच्यामध्ये चकमक सुरु आहे. त्याचसोबत बडगाममधील चदूरामध्ये एका इमारतीमध्ये तीन दहशतवाद लपून बसले असून त्याच्याकडून गोळीबार सुरु आहे. दरम्यान दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु असून परिसराला जवानांनी घेराव घातला आहे.

सर्च ऑपरेशन दरम्यान दोन नारिकांचा मृत्यू

श्रीनगरच्या नूरबाग परिसरामध्ये गुरुवारी जवानांनी घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु केले. या सर्च ऑपरेशन दरम्यान एका नागरिकाचा मृत्यू झाला. या परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर संपूर्ण परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. या सर्च ऑपरेशन दरम्यान गोळीबार झाल्याचा आवाज आला आणि एका नागरिकाचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. मोहम्मद सलीम असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सलीमचा मृत्यू जवानांकडून चालवलेल्या गोळीबारात झाला की दहशतवाद्यांनी गेलेल्या गोळीबारात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. स्थानिकांनी जवानांनी केलेल्या गोळीबारात सलीमचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -