घरदेश-विदेशभादंवि ४९७ रद्द; विवाहबाह्य सबंध आता गुन्हा नाही - सुप्रीम कोर्ट

भादंवि ४९७ रद्द; विवाहबाह्य सबंध आता गुन्हा नाही – सुप्रीम कोर्ट

Subscribe

विवाहबाह्य संबंधाना गुन्हा ठरवणारे भारतीय दंड विधान (IPC) कलम ४९७ घटनाबाह्य असून स्त्री आणि पुरुष समान असल्याचा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टाने आज हे कलम रद्द केले.

भारतीय दंड विधान कायद्याचे कलम ४९७ (व्याभिचार) हे घटनाबाह्य असल्याचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज सांगितले आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने व्याभिचार हा गुन्हा नसल्याचा सर्वसमावेशत असा निर्णय दिला आहे. व्याभिचार हा घटस्फोटासाठी कारणीभूत ठरू शकतो, मात्र त्यावर इतर नागरी कायदे आहेत – असे मत सुप्रीम कोर्टाने व्याभिचाराचे कलम रद्द करताना नमूद केले आहे. विवाह्यबाह्य संबंध हे भादंवि कलम ४९७ अन्वये फौजदारी स्वरुपाचा गुन्हा ठरत होता. यासंबंधात सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरुष आणि स्त्री यांच्यात भेदभाव करता येणार नाही, दोन्हीही समान आहेत. विवाहबाह्य संबंधात केवळ पुरुषाला दोषी ठरवता येणार नाही तसेच पतीला तक्रार करण्याचा अधिकार होता, मात्र पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत व्याभिचार हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला.

याचिकाकर्त्यांचे वकिल राज कालिश्वरम यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने सर्वसमावेश निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या निर्णयावर आम्ही आनंदी आहोत.

- Advertisement -

नक्की काय म्हणाले सरन्यायाधीश दीपक मिश्रा

व्याभिचाराबाबतचा कायदा हा १५८ वर्ष जुना कायदा आहे, ज्याला आज सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवले. “महिलांच्या वैयक्तिक प्रतिष्ठा आणि समानतेला बाधित करणारे कायदे हे संविधानाप्रती असंतोष व्यक्त करतात. आता वेळ आली आहे हे सांगण्याची की, पती हा पत्नीचा मालक नाही. एका व्यक्तिचे दुसऱ्या व्यक्तिवर असलेले लैंगिक कायदेशीर सार्वभौमत्व पुर्णतः चुकीचे आहे.” असे मत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी निकालाचे वाचन करताना प्रकट केले.

- Advertisement -

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -