घरदेश-विदेशबिहारमध्ये इव्हीएम हॉटेलमध्ये सापडल्या

बिहारमध्ये इव्हीएम हॉटेलमध्ये सापडल्या

Subscribe

निवडणूक अधिकार्‍याला बजावली नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. यावेळी बिहारमधील मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना एका हॉटेलमध्ये चार ईव्हीएम सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी निवडणूक अधिकार्‍याला नोटीस बजावण्यात आली आहे.

सेक्टर मॅजिस्ट्रेट अवधेश कुमार हॉटेलमध्ये सापडलेल्या ईव्हीएमचे संरक्षक होते. माझ्याकडे 4 ईव्हीएम मशीन होत्या. एखाद्या मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास या अतिरिक्त ईव्हीएमचा वापर केला जाणार होता, असे स्पष्टीकरण कुमार यांनी दिले. गाडीच्या चालकाला जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे होते, त्यामुळे मी ईव्हीएम घेऊन गाडीतून उतरलो आणि एका हॉटेलमध्ये थांबलो, असे कुमार यांनी सांगितले. हॉटेलमध्ये ईव्हीएम असल्याची माहिती आसपास पसरताच एकच गोंधळ उडाला. हे वृत्त मतदान केंद्रावर पोहोचताच आणखी गदारोळ झाला.

- Advertisement -

यानंतर स्थानिक एसडीओ कुंदन कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चारही ईव्हीएम ताब्यात घेतल्या. मुजफ्फरपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन घोष यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. याशिवाय अवधेश कुमार यांना बेजबाबदारपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. ईव्हीएम हॉटेलमध्ये कशा पोहोचल्या, याबद्दल खुलासा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -