घरक्रीडास्वतःच्या स्वार्थासाठी आफ्रिदीने अनेकांची कारकीर्द संपवली

स्वतःच्या स्वार्थासाठी आफ्रिदीने अनेकांची कारकीर्द संपवली

Subscribe

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी सध्या त्याच्या ‘गेम चेंजर’ नामक आत्मचरित्रामुळे चांगलाच चर्चेत आहे. या पुस्तकात त्याने अनेक वादग्रस्त गोष्टी लिहिल्या आहेत. तसेच यात त्याने पाकिस्तान आणि इतरही देशांतील काही क्रिकेटपटूंवर टीका केली आहे. ही त्याची टीका त्याचा पाकिस्तान संघातील माजी सहकारी इम्रान फरहतला आवडलेली नाही आणि त्याने आपल्या भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत. आफ्रिदीने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांची कारकीर्द संपवली, असा आरोपही फरहतने केला आहे.

शाहिद आफ्रिदीच्या नव्या पुस्तकाबाबत ज्या गोष्टी मी ऐकल्या आणि वाचल्या आहेत, त्या अतिशय लाजीरवाण्या आहेत. जो व्यक्ती जवळपास २० वर्षे आपल्या वयाबाबत खोटे बोलत होता, त्याने अचानकपणे सर्व गोष्टी कबूल करण्याचा आणि काही महान क्रिकेटपटूंना दोष निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

आम्हाला ज्याच्यासोबत खेळण्याचे भाग्य लाभले, अशा या ‘संत’ माणसाविषयी माझ्याकडे अनेक कहाण्या आहेत. त्याच्याकडे एक राजकारणी होण्याइतकी प्रतिभा आहे. माझ्याकडे त्याच्याविषयी अनेक कहाण्या आहेत आणि त्याने ज्या खेळाडूंना दोष दिला आहे, त्यांना मी पुढे येऊन या स्वार्थी माणसाचे खरे रूप लोकांसमोर आणावे अशी विनंती करतो. त्याने आपल्या स्वार्थासाठी अनेकांची कारकीर्द संपवली, असे फरहतने आपल्या ट्विट्समध्ये लिहिले.

डावखुरा सलामीवीर फरहतने ४० कसोटी, ५८ एकदिवसीय आणि ७ टी-२० सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -