घरदेश-विदेशStatus Symbol साठी खरेदी केले जातायत महागडे फोन; भारतीय अव्वल

Status Symbol साठी खरेदी केले जातायत महागडे फोन; भारतीय अव्वल

Subscribe

भारतीय स्मार्टफोनकडे एक स्टेटस सिंबल म्हणून बघत आहेत. त्यामुळे Show off साठी महागडे फोन खरेदी केले जात आहेत.

नवी दिल्ली:महागडे स्मार्टफोन घेण्याचा ट्रेंड भारतीयांमध्ये झपाट्याने वाढला आहे. जगातील टॉप-5 जागतिक बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे, जेथे आयफोन निर्माता अॅपलचे प्रीमियम अल्ट्रा स्मार्टफोन विभागात वर्चस्व आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अहवालानुसार, भारतात 45 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोन्सना मोठी मागणी दिसून येत आहे. (Expensive phones are bought for Status Symbol Indian s Top)

भारतीय स्मार्टफोनकडे एक स्टेटस सिंबल म्हणून बघत आहेत. त्यामुळे Show off साठी महागडे फोन खरेदी केले जात आहेत.

- Advertisement -

चीन, भारत, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये प्रीमियन स्मार्टफोनची विक्री सर्वाधिक आहे. पंरतु भारत यात सर्वात पुढे आहे, जिथे एक नवीन रेकॉर्ड पाहायला मिळाला आहे. भारत जागतिक स्तरावर जलद गतीनं वाढत असलेला प्रीमियम स्मार्टफोन मार्केट आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील स्मार्टफोन सेलमधील सर्वाधिक खरेदी EMI वर केली जात आहे.

भारताचे दरडोई उत्पन्न 2601 डॉलर आहे. जे अंगोला सारख्या देशाच्या तुलनेतही खूप कमी आहे. अंगोला देशाचे दरडोई उत्पन्न 3205 डॉलर आहे. तर अमेरिकेत प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 80,035 डॉलर आहे. सध्या प्रिमियम स्मार्टफोनच्या बाबतीत भारतात अॅप्पलला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. अॅप्पलचा भारताच्या प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमधील मार्केट शेअर सुमारे 25 टक्के आहे.

- Advertisement -

अॅप्पलची खरेदी जोरात

काऊंटर पॉईंटरच्या रिपोर्टनुसार वर्ष 2023 मध्ये भारतातील प्रीमियम स्मार्टफोन मार्केट वेगानं वाढलं आहे. प्रीमियम स्मार्टफोनबद्दल बोलयाचं झालं तर वर्ष 2023 मध्ये जगभरात सर्वात जास्त प्रीमियम स्मार्टफोन सेलच्या बाबतीत अ‌ॅप्पल पुढे आहे, परंतु अॅप्पलच्या मार्केट शेअरमध्ये घसरण झाली आली आहे.

2022 मध्ये अॅप्पलचा मार्केट शेअर 75 टक्के होता जो 2023 मध्ये कमी होऊन 71 टक्के झाला आहे. अॅप्पलचा मार्केट शेअरमध्ये कमी होण्यामागे हुआवे मेट 60 स्मार्टफोन सीरीज कारण असल्याचं म्हटलं जात आहे. ग्लोबली प्रीमियम स्मार्टफोन मार्केट शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. अ‌ॅप्पलनंतर सॅमसंग दुसरा सर्वात जास्त विकला जाणारा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड आहे. सॅमसंगटा मार्केट शेअर सुमारे 17 टक्के आहे, जो गेल्या वर्षांपर्यंत 16 टक्के होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -