घरमनोरंजनकोण आहे बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल ?...

कोण आहे बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल ?…

Subscribe



चित्रपट सृष्टीत आयटम सॉंग ही नवी गोष्ट नाही. चाळीस- पन्नासच्या दशकापासून रुपेरी पडद्यावर आयटम सॉंग हा प्रकार प्रचलित आहे. आयटम सॉंग सगळ्याच मसाला चित्रपटांचा अविभाज्य भाग होऊन गेला आहे. गेल्या काही वर्षातील मुन्नी बदनाम हुई, छईया -छईया , बिडी जलई ले, अनारकली डिस्को चली अशी आयटम सॉंग्स ची कैक उदाहरणं देता येतील.
चाळीस-पन्नास च्या दशकातील कुक्कू ही हिंदी चित्रपट सृष्टीतली पहिली आयटम गर्ल म्हणून ओळखली जाते. कुक्कू त्या काळात एक आयटम सॉंग करण्याचे ६००० रुपये एवढं भरभक्कम मानधन घ्यायची. हाच सिलसिला आजही कायम आहे. आजच्या घडीला नोरा फतेही ही डान्सर दोन कोटी आणि अंदाजे तेवढीच रक्कम सनी लिओनीही घेते. तर मलाईका अरोरा सारखी प्रसिद्ध अभिनेत्री पन्नास लाख ते एक कोटी एवढी रक्कम घेते. करीन कपूर एका आयटम सॉंगसाठी दिड कोटीपेक्षा जास्तीची मागणी करायची. कतरिना कैफ दोन कोटी आणि जैकलीन फर्नांडीस तीन कोटी रुपये घेते.
मात्र साऊथची अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने या सगळ्यांचेच रेकॉर्ड मोडले आहेत. सामंथा आयटम सॉंग करणारी सर्वात महागडी आयटम गर्ल म्हणून ओळखली जाते. तिने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील “ऊ अंटवा… ” या आयटम सॉंगसाठी पाच कोटी रुपये घेतले होते असं म्हटलं जातं. महत्वाची गोष्ट ही की, याच चित्रपटातील नायिकेची भूमिका करणाऱ्या रश्मिका मंदाना या अभिनेत्रीला मात्र दोन कोटी रुपयांत समाधान मानावं लागलं आहे. एवढंच नव्हे तर मिळालेल्या माहितीनुसार जान्हवी कपूर, पूजा हेगड़े, तमन्ना भाटिया और तापसी पन्नू या अभिनत्रीदेखील चित्रपटातील त्यांच्या संपूर्ण भूमिकेसाठी दोन कोटीपेक्षाही कमी मानधन घेतात.




- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -