घरदेश-विदेशशास्त्रज्ञांचं भन्नाट यश; नामशेष झालेला पांढरा गेंडा पुन्हा अस्तित्वात येणार!

शास्त्रज्ञांचं भन्नाट यश; नामशेष झालेला पांढरा गेंडा पुन्हा अस्तित्वात येणार!

Subscribe

पृथ्वीवरून नामशेष झालेली पांढऱ्या गेंड्यांची जमात पुन्हा अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांनी कृत्रिमरीत्या मादी गेंड्याची अंडी विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास पांढरा गेंडा पुन्हा जन्म घेऊ शकेल.

गेल्या वर्षी केनियामध्ये पृथ्वीवरचा शेवटाचा पांढरा गेंडा मेल्यानंतर जगभरातल्या वन्यजीव प्रेमींनी हळहळ व्यक्त केली होती. वन्य प्राण्यांची एक जमात पूर्णपणे नामशेष होणं ही आख्ख्या जगासाठीच खेदाची बाब होती. पण आता हाच पांढरा गेंडा पुन्हा अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्टिफिशिअल फर्टिलायझिंग अर्थात कृत्रिमरित्या प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेतून पांढऱ्या गेंड्याला नवजीवन देण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास एक पूर्णपणे नामशेष झालेली प्राणी प्रजात पुन्हा पृथ्वीवर अस्तित्वात येईल.

काय केलं संशोधकांनी?

गेल्या वर्षी केनियाजवळ नैरोबीच्या जंगलात वयामुळे मृत्यू पावलेला सुदान हा शेवटचा पांढरा गेंडा त्याची मुलगी नाजिन आणि तिची मुलगी फटू अशा दोघींसोबत राहात होता. सुदान मरण पावण्याआधीच शास्त्रज्ञांनी पांढरा गेंडा जातीच्या काही गेंड्यांचे शुक्राणू साठवून ठेवले होते. सुदान मरण पावल्यानंतर या दोघींच्या मार्फत पांढऱ्या नर गेंड्याला जन्म देण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला. मात्र, या दोघींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते शक्य होऊ शकलं नाही. त्यानंतर आता शास्त्रज्ञांनी नवी शक्कल शोधून काढली आहे.

- Advertisement -

बर्लिनच्या प्रयोगशाळेमध्ये नाजिन आणि फटू या दोघींच्या अंडाशयातून शास्त्रज्ञांनी प्रत्येकी ५ अंडी काढून त्यात कृत्रिम पद्धतीने आधी साठवलेले शुक्राणू इंजेक्ट केले. आता या १० पैकी ७ अंड्यांमध्ये शुक्राणू यशस्वीपणे इंजेक्ट झाले आहेत. आता बर्लिन प्रयोगशाळेमध्ये या अंड्यांमध्ये होणाऱ्या हालचालींची निरीक्षणं ठेवली जात आहेत. पुढचा काही काळ ही सातही अंडी योग्य पद्धतीने विकसित झाली, तर ती काळा गेंडा जातीच्या मादीच्या अंडाशयामध्ये सोडण्यात येतील. ही मादी गेंडा सरोगेट मदरप्रमाणे शुक्राणू असलेली आणि पांढऱ्या मादी गेंडाची अंडी आपल्या पोटात वाढवून नव्या पांढऱ्या गेंड्याला जन्माला घालेल. शुक्राणू आणि अंडी ही पांढरा गेंडा जातीचीच असल्यामुळे सामान्य मादी गेंड्याने जन्म देऊनही पांढरा गेंडाच जन्माला येईल अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे.


हेही वाचा – अरेच्चा…चंद्राचा आकार झाला कमी; नासाच्या संशोधकांचा दावा!

१९७०च्या दशकामध्ये केनियामध्ये एकूण गेंड्यांची संख्या २० हजारांच्या घरात होती. मात्र सातत्याने होत असलेल्या शिकारीच्या घटनांमुळे ती संख्या आता फक्त ६५०च्या घरात शिल्लक राहिली आहे. हे सर्व काळ्या जातीचे गेंडे आहेत. तर पांढऱ्या जातीचा एकमेव शिल्लक नर गेंडा असलेला सुदान गेल्या वर्षी नैरोबीच्या जंगलामध्ये मरण पावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -