घरताज्या घडामोडीकर्जाच्या ओझ्यामुळे कुटुंबाने संपवलं जीवन; 5 जणांचा मृत्यू, एक गंभीर

कर्जाच्या ओझ्यामुळे कुटुंबाने संपवलं जीवन; 5 जणांचा मृत्यू, एक गंभीर

Subscribe

कर्जाच्या ओझ्यामुळे एका कुटंबाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली. बिहारच्या नवादा परिसरातील न्यू एरिया येथील केदार लाल गुप्ता यांनी बुधवारी रात्री पत्नी आणि ४ मुलांसह विष पिऊन आत्महत्या केली.

कर्जाच्या ओझ्यामुळे एका कुटंबाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली. बिहारच्या नवादा परिसरातील न्यू एरिया येथील केदार लाल गुप्ता यांनी बुधवारी रात्री पत्नी आणि ४ मुलांसह विष पिऊन आत्महत्या केली. एकात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण बिहारमध्ये खळबळ माजली आहे. (family struggling under the burden of debt commit Suicide 5 people died)

कर्जाच्या ओझ्यामुळे जीवन संपवलेल्यांमध्ये 5 जणांचा समावेश आहे. केदार लाल गुप्ता, पत्नी अनिता कुमारी, 3 मुले प्रिन्स कुमार, शबनम कुमारी, गुडिया कुमारी यांचा समावेश आहे. तसेच, 1 मुलगी साक्षी तिची अवस्था बिकट असल्याचे समजते. साक्षीवर सध्या नवादा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर तिला पटणा येथे नेण्यात आले आहे.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

केदार लाल गुप्ता शहरातील विजय बाजारात फळांचे दुकान चालवतात. त्यांच्यावर खूप कर्ज होते. त्यामुळे कर्ज देणाऱ्यांनी त्यांच्यावर पैशांसाठी दबाव टाकला होता. वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून केदार गुप्ता आणि कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विष पिऊन आत्महत्या केली. मात्र यामध्ये एका मुलीचा जीव सुदैवाने वाचला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा केदार गुप्ता हे जिवंत होते. पोलिसांनी त्यांना विचारले असता. ते म्हणाले की, माझ्या कुटुंबावर 10-12 लाखांचे कर्ज आहे. या कर्जाच्या ओझ्याखाली आम्हाला जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वांनी आनंदाने विष प्यायल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विष पिण्याआधी केदार गुप्ताचा मुलगा प्रिन्सने एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, बाजारात काही लोकांकडून कर्ज घेतले होते. ते पैशासाठी आम्हाला सतवत आहेत. आम्ही पैसे परत देण्यासाठी थोडा वेळ मागितला होता. परंतु, ते ऐकण्यास तयार नव्हते. वारंवार धमकावत होते. त्यामुळे सर्वांनी विष पिण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – संजय राऊतांचा बदलला सूर अन् नूर! भाजपाबद्दल चकार शब्द नाही, लक्ष्य फक्त शिंदे गट!!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -