घरदेश-विदेशस्टील मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले प्रसिद्ध उद्योगपती जमशेद इराणी यांचे निधन

स्टील मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले प्रसिद्ध उद्योगपती जमशेद इराणी यांचे निधन

Subscribe

भारतात परतून जमशेद इराणी यांनी टाटा स्टील कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली.

स्टील मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले उद्योगपती जमशेद जे इराणी यांचे निधन झाले आहे. सोमवार 31 ऑक्टोबर रोजी जमशेद इराणी यांनी अखेरचा श्वास घेतला. जमशेद इराणी हे 85 वर्षांचे होते. (Famous industrialist Jamshed Irani, known as Steel Man of India, passed away)

या संदर्भांत टाटा स्टील कडून एक निवेदन जारी करण्यात आले. त्या निवेदनात म्हटल्या प्रमाणे, ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले पद्मविभूषण डॉ. जमशेद जे इराणी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती देत असताना टाटा ग्रुप अत्यंत दु:खी आहे. त्यांनी काल सोमवार 31ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता जमशेदपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

जून 2011 मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून जमशेद इराणी सेवानिवृत्त झाले. त्यांनी 1956 मध्ये नागपुरमधून विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर 1957 मध्ये नागूपर विद्यापीठातून त्यांनी एमएससीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते जेएन टाटा स्कॉलर म्हणून ब्रिटन युनिवर्सिटी ऑफ शेफील्ड येथे गेले आणि 1960 मध्ये दव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याशिवाय 1963 मध्ये त्यांनी त्यांची पीएचडीसुद्दा पूर्ण केली होती.

त्यानंतर भारतात परतून जमशेद इराणी यांनी टाटा स्टील कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी टाटा गृपच्या काही कंपन्यांचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जमशेद इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी आणि तीन मुलं जुबिन, निलोफर आणि तनाझ असा परिवार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  कन्नड पोलिसांची दडपशाही, ठाकरे गटाची ‘मशाल फेरी’ रोखल्याने शिवसैनिक संतप्त

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -