घरमहाराष्ट्रनाशिक६ नोव्हेबर पर्यंत खड्डे बुजवा, भुजबळांनी दिला अखेरचा अल्टिमेटम

६ नोव्हेबर पर्यंत खड्डे बुजवा, भुजबळांनी दिला अखेरचा अल्टिमेटम

Subscribe

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे ते पिंपळगाव बसवंत पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत बुजवले नाही तर ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी दिला आहे. या काळात टोलवसूली बंद ठेवता येणार नसली तरी टोलनाक्यावर लांब रांगा लागल्या तर वाहनधारकांना मोफत सोडण्याची सूचनाही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे ते पिंपळगाव बसवंत पर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडल्याची तक्रार माजी मंत्री भुजबळांनी केली होती. तसेच 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत हे खड्डे भरले नाही तर 1 नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी सोमवारी (दि.31) महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकार्‍यांनाही माहिती देण्यास सांगितले. खडे भरण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून येत्या 6 तारखेपर्यंत संपूर्ण रस्ता खड्डेमुक्त होईल, असेही महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी साळुंखे यांनी सांगितले. तर, भुजबळ म्हणाले की, खड्डे बुजवणे म्हणजे तात्पुरते काम असून त्यानंतर रस्त्याचे संपूर्ण काम झाले पाहिजे. ज्या कंपन्यांकडे हे काम आहे, अशा पिंक इन्फ्रा, वरुण चंद्रा यांची भेट घेवून त्यांनाही काम करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -