घरदेश-विदेशलग्नाला न विचारता गेली म्हणून वडिलांनीच केली मुलीची हत्या

लग्नाला न विचारता गेली म्हणून वडिलांनीच केली मुलीची हत्या

Subscribe

मुलगी न सांगता लग्नाला गेली हे कळताच राजीव यांना राग आला होता. त्यांनी रुबेलला लग्नाला जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ती का गेली ? याचा जाब विचारण्यासाठी ते रुबेलची वाट पाहत होते.

लग्नाला जाऊ नको, असे वडिलांनी सांगून देखील मुलगी लग्नाला गेली. त्यामुळे चिडलेल्या बापानेच मुलीची हत्या केली आहे. हरयाणातील कर्नाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी घरी असलेल्या बंदुकीतून मुलीवर गोळ्या झाडल्या. राजीव कुमार असे त्यांचे नाव असून मुलीचे नाव रुबेल असे आहे. यात रुबेलचा मृत्यू झाला आहे. रुबेल २२ वर्षांची असून ती बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आठ महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य । प्रेयसीने केली होती हत्या

गोळ्या झाडून व्यक्त केला राग

मुलगी न सांगता लग्नाला गेली हे कळताच राजीव यांना राग आला होता. त्यांनी रुबेलला लग्नाला जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ती का गेली ? याचा जाब विचारण्यासाठी ते रुबेलची वाट पाहत होते. शुक्रवारी दुपारी ती लग्नावरुन आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातील लायसन बंदुक काढली आणि तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या तिच्या छातीत आणि पोटात बसल्या. गोळ्या लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रुबेलला घरातील इतरांनी तातडीने रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

नवऱ्याची जेवणावरुन तक्रार; पत्नीची आत्महत्या

पोलिसांनी तातडीने केली अटक

राजीव यांना मुलीने लग्नाला जाण्यापेक्षा घरी अभ्यास करावा असे वाटत होते. त्यांनी तिला जाऊ नको असे सांगूनही ती ऐकली नाही. म्हणून राजीव यांनी रुबेलवर गोळ्या झाडल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -