घरदेश-विदेशधक्कादायक! बाळाचे लिंग पाहण्यासाठी पतीने गर्भवती पत्नीचं पोटच कापलं

धक्कादायक! बाळाचे लिंग पाहण्यासाठी पतीने गर्भवती पत्नीचं पोटच कापलं

Subscribe

पोटीतील बाळाचं लिंग पाहण्यासाठी त्याने पत्नीच पोट फाडण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील पाच मुलींच्या बापाने अत्यंत दृष्कृत्य केले असून स्त्री-पुरुष समानतेसाठी विविध योजना राबविणाऱ्या देशात आजही असा प्रकार घडणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. मुली देखील आजच्या स्पर्धेच्या युगात आपले वर्चस्व टिकवून ठेवत असताना देशात आजही मुलगाच हवा यावर ठाम असणारे काही संकुचित विचारसरणीचे लोकं दिसतायंत. असाच विचार असलेल्या या ५ मुलीच्या बापाने आपल्या गर्भवती पत्नीसोबत अत्यंत क्रृरतेची वागणूक केली आहे. सध्या ही गर्भवती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

उत्तर प्रदेशातील पतीने आपल्या गर्भवती पत्नीला मुलगा होईल की नाही हे तपासण्यासाठी चक्क आपल्या पत्नीचं पोट कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटीतील बाळाचं लिंग पाहण्यासाठी त्याने पत्नीच पोट फाडण्याचा प्रयत्न केला. पन्नालाल असे या बापाचे नाव असून त्याने यासाठी धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचे पोट कापले. यानंतर महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पन्नालाल याला मुलीची अपेक्षा होती. याआधी त्याला ५ मुली आहे. आता मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी त्याने धारदार शस्त्राने पत्नीचं पोट कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला ६ ते ७  महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकारानंतर महिलेला तातडीने बरेली रुग्णालयात हलविण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.


Corona: ‘वाढता संसर्ग पाहता ससूनमध्ये येत्या काही दिवसांत खाटांची क्षमता वाढविण्यात येणार’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -