घरमुंबईमनसेचे कायदेभंग आंदोलन; संदीप देशपांडेंसह पदाधिकाऱ्यांनी केला लोकलने प्रवास

मनसेचे कायदेभंग आंदोलन; संदीप देशपांडेंसह पदाधिकाऱ्यांनी केला लोकलने प्रवास

Subscribe

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी हा लोकल प्रवास केला आहे. सर्वसामान्यांसाठीही लोकलचा प्रवास सुरू करण्यात यावा यासाठी मनसेने हे सविनय कायदेभंग आंदोलन केले.
रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी हा प्रवास केला. रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस पोलिसांनी संदीप देशपांडे यांना बजावली होती. तर सर्व नागरिकांना लोकल ट्रेन प्रवास करण्याची परवानगी द्या, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याकरता एक
आठवड्याची मुदतही दिली होती. अन्यथा कायदा तोडण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला होता.

मनसे नेत्याचा लोकल प्रवास, सर्वसामान्यांसाठीही रेल्वे प्रवास सुरू करण्याची मागणी

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, September 20, 2020

- Advertisement -

लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन केले आहे. सध्या अत्यावश्यक – आपत्कालीन सेवा, शासकीय-महापालिका आणि बँक कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. मनसेने आज सविनय कायदेभंग आंदोलन पुकारल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, तरीही पोलिसांना गुंगारा देऊन संदीप देशपांडे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकल गाठली.

मनसेच्या आंदोलनाला डबेवाला असोशिएशनचा पाठिंबा

मनसेने डबेवाल्यांच्या मागणीला उचलून घेतले आहे त्या बद्दल मनसेचे आभार! दोन महिन्यापूर्वी ‘मुंबई डबेवाला असोशिएशन’ यांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती की लोकल सेवा बहाल करा, अन्यथा मुंबईच्या डबेवाल्यांची जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानून डबेवाल्याला लोकलने प्रवास करू देण्यात यावा. परंतु दोन महिने त्यांवर रेल्वे प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. ना लोकल सेवा बहाल केली ना डबेवाल्यांची सेवा अत्यावश्यक मानून लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली. ज्या कार्यालयात शक्य आहे तेथे डबेवाले सायकलवर जेवणाचे डबे पोहोचवत आहेत. परंतु जोपर्यंत लोकल सेवा बहाल होत नाही तोपर्यंत डबेवाला आपली सेवा पूर्ण क्षमतेने देऊ शकत नाही. रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा बहाल करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मनसे प्रमाणे मुंबई डबेवाला असोशिएशनला लोकलने प्रवास करून सविनय कायदेभंग करावा लागेल. केंद्र सरकार आणी रेल्वे प्रशासनाने आमची अडचण समजून घ्यावी आणि डबेवाल्यांची सेवा आत्यावश्क सेवा मानून डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्यात यावा. ही नम्र विनंती.
– सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोशिएशन

- Advertisement -

हेही वाचा –

भिवंडीतील ४३ वर्ष जुनी इमारत पहाटे साडेतीनच्या सुमारास कोसळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -