घरदेश-विदेशअखेर उर्मिलाने केला काँग्रेस पक्षात प्रवेश

अखेर उर्मिलाने केला काँग्रेस पक्षात प्रवेश

Subscribe

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज अधिकृत रित्या काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. पत्रकार परिषदेत तिने ही घोषणा केली.

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. आज अखेर अधिकृतरित्या उर्मिलाने पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या जेष्ठनेत्यांच्या उपस्थित तिने पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी उर्मिलाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली. आजच्या कार्यक्रमात उर्मिलाने पक्षात प्रवेश केला असला तरीही उमेदवारी जाहीर केली नाही. मात्र उर्मिला मातोडंकरला उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्यात येणार असल्याची चर्चा रंगते आहे.

- Advertisement -

काय म्हणाली उर्मिला

“निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष अभिनेत्यांचा वापर करते. मात्र मी फक्त निवडणुकासाठी पक्षात प्रवेश केला नाही तर लहानपणापासून माझ्या घरात काँग्रेसची विचारधारा होती. याविचार धारेमुळे मी काँग्रेसमध्ये आली. निवडणूक आहे म्हणून मी पक्षात प्रवेश करत नाही किंवा निवडणूक संपल्यावरही मी पक्षातून जाणार नाही.आपले संविधान हे इतर देशांच्या तुलनेत चांगले आहे. या संविधानात लोकशाहीसाठी स्थान आहे. काँग्रेस केंद्रात सत्तेत नसले तरीही मी काँग्रेसच्या पाठीशी आहे.” – उर्मिला मातोंडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -