घरमुंबईनावेद अंतुले शिवसेनेत; तटकरेंची डोकेदुखी वाढली

नावेद अंतुले शिवसेनेत; तटकरेंची डोकेदुखी वाढली

Subscribe

दिवंगत माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नावेद अंतुले यांनी २७ मार्च रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नावेद अंतुले यांनी आज, २७ मार्च रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नावेद यांच्या शिवसेना प्रवेशामुळे रायगड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जातं आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नावेद अंतुले हे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार करणार आहे. सुनील तटकरे यांनी अंतुले कुटुंबाकडे पाठ फिरवल्याने नावेद अंतुले नाराज होते. त्यामुळे आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे सुपूत्र नावेद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून यावेळी त्यांनी शिवसेनेतच का आलो याबाबत मत व्यक्त केले. #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮಾರ್ಚ್ 27, 2019

- Advertisement -

काय म्हणाले उद्धव ठाकरे

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, शिवसेना प्रमुख आणि अंतुले यांच्यात ऋणानुबंध होते. मात्र राजकारणात ते जुळले नाहीत. परंतू आता आमची दुसऱ्या पिढीने हे ऋणानुबंध जुळवण्याचे काम केले आहेत. त्यामुळेच नावेद अंतुले यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेत आहोत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. यावेळी शिवसंग्रामचे रायगडचे अध्यक्ष उदयभाऊ आमोणकर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरे ऑन ऑपरेशन शक्ती

अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. जवान असो की शास्त्रज्ञ, प्रत्येकजण आपली कामगिरी बजावत असतो. त्यांना सरकारच्या पाठबळाची गरज असते. हे पाठबळ सरकार देत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. देशाची प्रतिमा उचवण्याचं काम या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे.

- Advertisement -

उद्धव ऑन निवडणूक टायमिंग

टायमिंगला टायमिंग नसतं. निवडणुका येत – जात असतात, देशाची प्रगती थांबता कामा नये. कोण याकडे कुठल्या नजरेने पाहतं यावर सगळं अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -