घरअर्थजगतया फायनान्स कंपन्या एफडीवर देत आहेत ८ टक्क्यांपर्यंत व्याज

या फायनान्स कंपन्या एफडीवर देत आहेत ८ टक्क्यांपर्यंत व्याज

Subscribe

टॉप रेटेड फायनान्स कंपन्यांच्या एफडींच्या मागणीत सध्या वाढ झाली आहे.

एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि महिंद्रा फायनान्स सारख्या टॉप रेटेड फायनान्स कंपन्यांच्या एफडींच्या मागणीत सध्या वाढ झाली आहे. कारण गुंतवणूकदार कर्ज म्युच्युअल फंडापासून स्वत: ला दूर करत आहेत. मे पासून २०-४० बेस पॉईंट (बीपीएस) वर व्याज दर कपात करूनही गुंतवणूकदार विविध कर्ज म्युच्युअल फंड उत्पादनांच्या तुलनेत चांगला परतावा आणि सुरक्षिततेसाठी या ठेवींकडे वळत आहेत.

महिंद्रा फायनान्स आणि बजाज फायनान्स ५ वर्षांच्या एफडीवर ७.८ टक्के आणि ७.६ टक्के दराने व्याज देत आहेत. एचडीएफसी ही सुविधा ७.१ टक्के दराने देत आहे. सरकारच्या लहान बचत ठेवींचे दर १०० बीपीएस कमी करण्याच्या सरकारच्या या कारवाईनंतर या कंपन्यांनी त्यांचे दर कमी केल्याचं वितरकांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विशाखापट्टणममध्ये पुन्हा गॅस गळती; ११ जणांचा मृत्यू


बँक ठेवींच्या तुलनेत सुमारे १६०-१९० बीपीएस भरणा म्हणून गुंतवणूकदार कंपनीच्या ठेवीकडे वळत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवींवर ५.७ टक्के ऑफर देत आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक ६ टक्के दर देत आहेत. सध्याच्या मंदीमध्ये नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या नियमित बँकांपेक्षा अधिक असुरक्षित असल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -