घरदेश-विदेशविशाखापट्टणममध्ये पुन्हा गॅस गळती; ११ जणांचा मृत्यू

विशाखापट्टणममध्ये पुन्हा गॅस गळती; ११ जणांचा मृत्यू

Subscribe

विशाखापट्टणमच्या एलजी पॉलिमर कंपनीत पुन्हा एकदा गॅस गळती सुरू झाली. या अपघातात जवळपासच्या गावांतील एक हजाराहून अधिक लोकांना याची बाधा झाली.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या एलजी पॉलिमर कंपनीत पुन्हा एकदा गॅस गळती सुरू झाली. गुरुवारी ज्या टँकरमधून स्टीरिन गॅसची गळती झाली, पुन्हा त्याच टँकरमधून स्टीरिन गॅस गळती झाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवळपास ५० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या.

विशाखापट्टणमचे जिल्हा अग्निशमन अधिकारी संदीप आनंद यांनी सांगितलं की, स्टायरिनची ज्या टँकरमधून गळती झाली होती, त्या टँकरमधूनच पुन्हा गळती सुरु झाली. अग्निशमन दलाची सुमारे ५० गाड्या हजर आहेत आणि एनडीआरएफच्या मदतीने कारवाई सुरू आहे. खबरदारी म्हणून आम्ही दोन ते तीन किलोमीटरच्या परिघात येणारी गावं रिकामी करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

हेही वाचा – गॅस गळती: १० जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी बोलावली आपत्कालीन बैठक


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तीन किलोमीटरच्या परिघात असलेली गावं रिकामी केली. लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तज्ज्ञांची टीम घटनास्थळी तातडीने पोहोचली, असं शहर पोलिस आयुक्त आर.के. मीना यांनी सांगितलं.

- Advertisement -

गॅस गळतीत ११ ठार

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये गुरुवारी झालेल्या गॅस गळतीच्या दुर्घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात जवळपासच्या गावांतील एक हजाराहून अधिक लोकांना याची बाधा झाली. सुमारे दोन डझन लोकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आलं आहे. सिंथेटिक रबर तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गॅस स्टीरिनमुळे लोकांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. गॅस गळतीची कारणे शोधण्यासाठी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.


हेही वाचा – विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत विषारी वायूची गळती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -