घरट्रेंडिंगकाँग्रेसच्या सिद्धारामय्यांचे महिलेशी गैरवर्तन, पाहा Video

काँग्रेसच्या सिद्धारामय्यांचे महिलेशी गैरवर्तन, पाहा Video

Subscribe

सिद्धारामय्या त्या महिलेला शांत करत असताना त्यांच्याकडून नकळत तिची औढणी खेचली गेल्याचं, काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमामध्ये लोकांच्या तक्रारी ऐकून घेत असताना, सिद्धारामय्या संतापले आणि त्यांनी एका तक्रारकर्त्या महिलेवर खेकसून तिची ओढणी ओढण्याचा प्रयत्न केला. याच घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे सिद्धारामय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. या व्हिडिओ प्रकरणावरुन भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. म्हैसूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हा प्रकार  घडला असून, सध्या देशभरात त्याची क्लिप व्हायरल होत आहे. संबंधित कार्यक्रमात तक्रार मांडण्यासाठी आलेली एक महिला सिद्घारामय्यांशी संवाद साधत होती. मात्र, सिद्घारामय्या यांनी दिलेलं उत्तर समाधनकारक नसल्यामुळे ती महिला त्यांच्याशी वाद घालत होती. यामुळे संतापलेल्या सिद्धारामय्या यांनी त्या महिलेला अनेकदा शांत राहण्यास सांगितले. मात्र, या नादात सिद्धारामय्या यांच्याकडून त्या महिलेची ओढणी खेचली गेली.

- Advertisement -

गैरवर्तन करण्याचा हेतू नव्हता…

घडलेल्या संपूर्ण प्रकाराविषयी स्पष्टीकरण देताना काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव म्हणाले की, ‘लोक कधीकधी टोकाचे प्रश्न विचारतात. त्यांची तक्रार ऐकून घेतली तरीही ते शांत बसत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या हातातील माईक खेचून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. सिद्धारामय्याही हेच करण्याचा प्रयत्न करत असताना चुकून महिलेची ओढणी खेचली गेली. तिच्याशी गैरवर्तन करण्याचा त्यांचा मुळीच हेतू नव्हता.’

भाजपने सोडले टीकास्त्र

या प्रकरणावरुन भाजपने काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी बोलताना भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर म्हणाले, की ”सिद्धारामय्या यांनी ज्याप्रकारे महिलेशी गैरवर्तन केले आहे, त्यावरूनच त्यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समजून येतो. हा एक गुन्हा असून, आता त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे.”

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -