घरदेश-विदेश'प्लेबॉय'च्या मुखपृष्ठावर फ्रेंच महिला मंत्री; वादांशी आहे जुने नाते

‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर फ्रेंच महिला मंत्री; वादांशी आहे जुने नाते

Subscribe

नवी दिल्ली : ‘प्लेबॉय’साठी पोझ देणे स्त्रीवादी असल्याचा पुरावा असू शकतो…? असा विश्वास एका महिला फ्रेंच मंत्र्याने व्यक्त केला आहे. याशिवाय तिने कपड्यांसह प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसण्याच्या तिच्या निर्णयाचा बचाव केला आहे. 2017 मध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राजकारणात आणलेल्या 40 वर्षीय स्त्रीवादी लेखिका मार्लेन शियाप्पा यांच्याकडे वादांचा मोठा इतिहास आहे. त्यांच्यावर उजव्या विचारसरणीचे लोक सहसा रागावतात.

पंतप्रधान आणि डाव्या विचारसरणीच्या समीक्षकांच्या मते मार्लेन शियाप्पा यांनी आपल्या ताज्या कृतीतून चूक केली आहे. ‘प्लेबॉय’साठी पोझ देताना महिला आणि समलिंगींच्या हक्कांबद्दल बोलणे, तसेच गर्भपातही बोलताना त्यांनी 12 पानांची मुलाखत दिली आहे. या मुलाखतीबाबत शनिवारी (१ एप्रिल) मार्लीन शियाप्पाने यांनी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटवर लिहिले की, “महिलांना प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी स्वत:च्या शरीरासह काय करायचे आहे, या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी मी याठिकाणी आहे. फ्रान्समध्ये महिला स्वतंत्र आहेत, मग धर्मांध आणि ढोंगी लोकांना ते वाईट वाटो की चांगलं.”

- Advertisement -

ग्लॅमर मॅगझिनच्या मुखपृष्ठावर डिझायनर पोशाख घातलेल्या मार्लेन शियापा यांच्या फोटोबाबत काहींचा विश्वास आहे की, यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. देशाच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्या एका सहाय्यकाने एएफपीला सांगितले की, पंतप्रधानांनी मार्लेन शियाप्पाला फोन करून सांगितेल की, “हे योग्य नाही, विशेषत: सध्याच्या वातावरणात.”

प्लेबॉयच्या फ्रेंच भाषेतील आवृत्तीत दिसलेल्या फोटोचा बचाव करताना, मासिकाचे संपादक जीन-क्रिस्टोफ फ्लोरेंटाईन यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, फ्रेंच सरकारमधील मंत्र्यांपैकी शियाप्पा मार्लीन या फोटोसाठी सर्वात योग्य होत्या, कारण त्या महिलांच्या अधिकारांशी जोडलेल्या आहेत आणि त्यांना माहित आहे की, हे मासिक स्त्रीवाद प्रचाराचे साधन बनू शकते.

- Advertisement -

फ्लोरेंटाइन यांनी असेही सांगितले की, ‘प्लेबॉय’ हे मासिक सॉफ्ट पॉर्न मासिक नाही, तर 300 पृष्ठांचे त्रैमासिक ‘मूक’ (मासिक आणि पुस्तकाची मिश्र आवृत्ती) आहे, जी बौद्धिक आहे आणि ट्रेंडिंगसुद्धा करत आहे. या मासिकात आजही स्त्रियांची नग्न छायाचित्रे छापली जात असली तरी ती जास्त पानांवर छापली जात नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -