घरताज्या घडामोडीगद्दार, खोके अन् कोथळा; त्यांच्याकडे एकच स्क्रिप्ट; एकदा नार्को टेस्ट होऊनच जाउद्या

गद्दार, खोके अन् कोथळा; त्यांच्याकडे एकच स्क्रिप्ट; एकदा नार्को टेस्ट होऊनच जाउद्या

Subscribe

नाशिक : विरोधकांना गद्दार, खोके, खंजीर अन् कोथळा ही एकच स्क्रीप्ट आहे. ती पुन्हा-पुन्हा ऐकून जनतेलाही कंटाळा आला आहे. त्यांना फक्त खोकेच माहित आहे. त्यामुळे ते दिवसरात्र खोक्यांविषयीच बोलतात. गद्दार आम्ही नव्हे ते आहेत. कारण, त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली. जनतेला भावनाविवश करायचे हेच त्यांना माहित आहे. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचा झपाटा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकायला लागली आहे, अशा शब्दांत कल्याणचे खासदार तथा मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी उध्दव ठाकरेंचा समाचार घेतला.

नाशिकमध्ये सह्याद्री बिझनेस पार्क, मायको सर्कल, तिडके कॉलनी येथे शिवसेना (शिंदे गट) मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.2) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, जनतेच्या मनात अजिबातच संशय नाही की, शिवसेना कुणाची आहे. ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली त्यांची शिवसेना कशी असू शकते? कोविड काळात घरात बसून भाषणबाजी करण्यापेक्षा व कोरडी आश्वासने देण्याऐवजी आम्ही मुख्यमंत्री शिंदे लोकांसाठी धावले. प्रत्येकाच्या कुटुंबासाठी मदतकार्य केले. आमदार कांदे यांच्या मागणीप्रमाणे सर्वांचीच नार्को टेस्ट एकदा होऊनच जाऊ द्या, अशीही मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविक केले. शिवसेना कार्यालय खर्‍याअर्थाने परिवर्तनाची नांदी ठरेल. रावणाच्या अंताला अन् रामाच्या कारकिर्दीला खर्‍या अर्थाने नाशिकमधून सुरुवात झाली. त्याचप्रमाणे विरोधकांच्या अंताची सुरुवातही नाशिकमधूनच होईल, असा टोलाही बोरस्ते यांनी लगावला. या कार्यालयात वैद्यकीय कक्ष, विधी कक्ष, वॉर रुम आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे हे कार्यालय लोकांच्या मदतीसाठी स्थापन केले आहे. या कार्यालयात कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल. त्यामुळे या कार्यालयाचे उद्घाटन नव्हे तर लोकार्पण करण्यात आले आहे. नाशिकच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार असून रिंगरोडसाठी तयारी सुरू आहे, त्याचे उद्घाटनही श्रीकांत शिंदे यांच्याच हस्ते होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या सोहळ्यायाप्रसंगी सहसंपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, राजु लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुदाम ढेमसे, आर. डी. धोंगडे, चंद्रकांत खाडे, श्यामकुमार साबळे, प्रभाकर पाबळे, उत्तम दोंदे, सुवणार्र् मटाले, संगीता जाधव, जयश्री खर्जुल, पूनम मोगरे, ज्योती खोले, मेधा साळवे, वैशाली दाणी, शिवाजी भोर, शोभा मगर, श्यामला दीक्षित, मंगला भास्कर, शोभा गटकळ, पूजा धुमाळ, ज्योती देवरे, सचिन भोसले, प्रताप मेहरोलिया, हरीष भडांगे, मामा ठाकरे, शिवाजी पालकर, ओमप्रकाश अग्रवाल, अमोल जोशी, शशिकांत कोठुळे आदी उपस्थित होते.

- Advertisement -
नाशिकसाठी लवकरच विशेष पॅकेज : दादा भुसे

पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, रोजगारनिर्मिती अन् कुंभमेळ्याच्या तयारीचा आराखडा तयार आहे. यातून विशेष पॅकेज नाशिकला मिळणार आहे. जेणेकरुन नाशिकचा विकास जलदगतीने होईल. सामान्य माणूस आणि शेतकरी यंदाच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी असून, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना सूट देण्याची घोषणा अडीच वर्षापूर्वी करण्यात आली होती. मात्र, शेतकर्‍यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी ट्रान्सफर करण्याचे काम शिंदे सरकारने केले. शेतकर्‍यांना कांद्याला साडेतीनशे रुपये भाव दिला. ठाणे जिल्ह्यानंतर एकनाथ शिंदे यांचे प्रेम नाशिकवर आहे. ज्याप्रमाणे कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई बदलतेय त्याप्रमाणे नाशिक बदलणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पालिका, जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार : आ. कांदे

महापालिका, जिल्हा परिषदेवर भगवा फडकावायचा आहे. यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढू. शेवटच्या थरापर्यंत शिंदेंचे काम पोहोचवू. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री दिवसरात्र झटत आहेत. म्हणून जनतेला पक्षाचा दृष्टीकोन समजून सांगायला हवा. गेल्या अडीच वर्षात जे निर्णय झाले नाहीत ते निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी 6 महिन्यांत घेतले. महिलांसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकर्‍यांसाठी, नोकरदारांसाठी शिंदे सरकार काम करत आहे. यात आपणही खारीचा वाटा उचलायला हवा, असे आवाहनदेखील त्यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना केले.

विशेष सत्कार सोहळा 

जॅक्सन वध खटल्यातील क्रांतिकारकांचे वंशज, काळाराम मंदिर सत्याग्रहातील सत्याग्रहींचे वंशज, सोबतच काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा लावण्यासाठी गेलेले तरुण आणि रामसेवक यांचा या सोहळ्यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात भानुदास ब्रम्हदेव जोशी ( वामनराव जोशी – काळेपाणी यांचे पुतणे), शरयू कुलकर्णी (जॅक्सन वध, आरोपी क्र. ४) धुडा मारू, राजेंद्र गायकवाड, शरद काळे, दिनकर दाणी, किशोर काळे, तुषार गालिंदे, नरेंद्र देशमुख, संजय लोणारी, तसेच राममंदिर आंदोलनातील कार्यकर्ते प्रशांत शिंगणे, साहेबराव पाटील, सुहास जपे, विनायक चांडक, सत्यकाम वर्मा, स्वप्ना सातपूरकर, रत्ना पेठे, सविता संत (सरडे), वैजयंती सिन्नरकर, सचिन पाटील, प्रताप गोपाळदास, अनिल वाघ, किशोर वारे, श्याम घरटे, समीर देव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -