घरदेश-विदेशहिजाब घातलात तर भरावा लागेल दंड, मुस्लीम जनतेला फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा इशारा

हिजाब घातलात तर भरावा लागेल दंड, मुस्लीम जनतेला फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा इशारा

Subscribe

फ्रान्समध्ये रविवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. यात उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मरीन ले पेन यांनी गुरुवारी जाहीर केले की, राष्ट्रपदी पदावर निवडून आल्यास सार्वजनिक ठिकाणी हिजाब परिधान करणाऱ्यांना दंड भरावा लागेल.
राष्ट्रपती पदासाठी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी कोणीही स्पर्धा करणार नसल्याचे मानले जात होते, मात्र मरीन ले पेन यांनी आक्रमक प्रचार करत असून आता त्या मॅक्रॉन यांना कडवी टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.

एका रेडिओ चॅनलशी बोलताना ले पेन म्हणाले की, ज्याप्रमाणे वाहनांमध्ये सीटबेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे मुस्लिमांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालू नये, असा निर्णयही लागू केला जाईल. सीटबेल्ट न लावल्यास ज्याप्रमाणे दंड आहे, त्याच प्रकारे हिजाब परिधान केल्यास लोकांना दंड भरावा लागेल. पोलिस त्याची अंमलबजावणी करू शकतील असे मला वाटते.

- Advertisement -

ले पेन पुढे म्हणाले की, त्यांच्या कायद्यांना भेदभाव करणारे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करून घटनात्मकदृष्ट्या आव्हान दिले जाऊ शकते. अशी आव्हाने टाळण्यासाठी ती जनमत चाचणीची पद्धत अवलंबणार आहे.
फ्रान्समध्ये यापूर्वी शाळांमध्ये धार्मिक चिन्हांवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकण्यासही मनाई आहे. 53 वर्षीय ले पेन मागील निवडणुकीत स्थलांतरितांविरुद्ध अधिक भाषण विधानं करत होत्या. परंतु यावर्षी त्यांनी देशांतर्गत समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यातून ले पेन मॅक्रॉन यांच्या निवडणूक रणनीतीला तगडी टक्कर देत आहेत.

फ्रान्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत जे सर्वेक्षण समोर येत आहे त्यावरून असे दिसून येतेय की, रविवारी होणाऱ्या निवडणुकीत ले पेन मॅक्रॉन यांना कडवी टक्कर देऊ शकणार नाहीत, मात्र दुसऱ्या टप्प्यात ते मॅक्रॉन यांना कडवी टक्कर देणार असल्याचे दिसते. 24 एप्रिल रोजी दुसऱ्या फेरीचे मतदान होणार आहे. या फेरीत मॅक्रॉन यांना 54 टक्के, तर ले पेन यांना 46 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, यावेळी फ्रेंच निवडणुकीत आरोग्य, महागाई, उत्पन्न आदी मूलभूत बाबींना मोठे प्राधान्य आहे. कोविड-19 आणि युक्रेन युद्धामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम झाला आहे, त्यामुळे लोक नाराज आहेत.


Pakistan government in crisis : इम्रान खान सरकारचा पराभव निश्चित, ९ एप्रिलला कशी असणार रणनीती?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -