घरभक्तीVastu Tips : घरात या दिशेला कॅलेंडर लावल्याने; चमकेल तुमचे भाग्य

Vastu Tips : घरात या दिशेला कॅलेंडर लावल्याने; चमकेल तुमचे भाग्य

Subscribe

कॅलेंडरचे आपल्या आयुष्यात तसेच आपल्या वास्तुमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. वास्तुनुसार एक योग्य दिशा निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे जर हे चुकीच्या दिशेला लावले तर त्याचे आपल्याला नुकसान भोगावे लागू शकते. परंतु कॅलेंडर जर योग्य दिशेला असेल तर घरात सुख-शांती टिकून राहते आणि घरात सकारात्मकता सुद्धा येते.

वास्तु शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तु शास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. खरंतर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तुचे मोठं महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे घरातील कपाट, घराचा रंग, पूजा घर, घरातील कॅलेंडर यांसारख्या प्रत्येक गोष्टीमागे वास्तुचे काही नियम आहेत.

अशीच एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅलेंडर , कॅलेंडरचे आपल्या आयुष्यात तसेच आपल्या वास्तुमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. वास्तुनुसार एक योग्य दिशा निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे जर हे चुकीच्या दिशेला लावले तर त्याचे आपल्याला नुकसान भोगावे लागू शकते. परंतु कॅलेंडर जर योग्य दिशेला असेल तर घरात सुख-शांती टिकून राहते आणि घरात सकारात्मकता सुद्धा येते.

- Advertisement -

वास्तु नुसार कोणत्या दिशेला असावे कॅलेंडर ?

  • वास्तु शास्त्रानुसार कॅलेंडर नेहमी घराच्या उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला लावावे.
  • जर तुम्हाला सामाजिक कार्यात प्रगती करायची असेल तर , कॅलेंडर घराच्या पूर्व दिशेस लावावे.
  • तुम्हाला आयुष्यात नवी संधी मिळवण्यासाठी तसेच व्यवसायात, नोकरीमध्ये  प्रमोशन मिळवण्यासाठी कॅलेंडर घराच्या उत्तर दिशेला लावा.
  • घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच घरात पैसे टिकण्यासाठी कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावा.

वास्तु नुसार या दिशेला चुकुनही लावू नये कॅलेंडर
कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये, जर तुम्ही चुकून जरी कॅलेंडर दक्षिण दिशेला लावले असेल तर, ते आजच काढून टाका. वास्तु शास्त्रानुसार कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये.

- Advertisement -

वास्तु नुसार कॅलेंडरशी संबंधीत काही खास गोष्टी

  • कॅलेंडर कधीही दरवाजाच्या पुढे किंवा मागे टांगू नये. यामुळे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करते. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते.
  • कॅलेंडरमधील तारीख, वार बघताना आपलं तोंड उत्तर , पूर्व किंवा पश्चिम दिशेला झालं पाहिजे.
  • कॅलेंडर वर कधीही हिंसक पशु किंवा कोणत्याही प्रकारचे भितीदायक चित्रे असू नयेत. तसेच कॅलेंडरवर रडणाऱ्या लोकांचे फोटो सुद्धा असू नयेत. कारण यामुळे घरात नकारात्मकता उत्पन्न होते.
  • याशिवाय घरात कधीही फाटके कॅलेंडर आणि मागील वर्षातील कॅलेंडर ठेऊ नये.

 हेही वाचा : Vastu Tips : फिश एक्वेरियममधील ‘या’ रंगाचा मासा करेल तुमच्या घरातील नकारात्मकता दूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -