घरक्रीडागौतम गंभीरची राजकारणात एंट्री?

गौतम गंभीरची राजकारणात एंट्री?

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यानंतर आता देशातील राजकीय सामन्यांमध्ये उडी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गौतम गंभीर आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्ली येथून भाजपकडून उमेदवारी लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदी लाटेमुळे लोकसभेच्या सर्व सात जागांवर विजय मिळवला होता. मात्र, या चार वर्षानंतर भाजपच्या हातातून काही जागा सूटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने नवीन राजकीय गणित मांडले आहे. या गणितानुसार ज्या मतदारसंघामध्ये हातातील जागा सूट शकते, अशा ठिकाणी भाजप सेलेब्रिटी लोकांना उमेदवारी देत आहे.

‘गौतम गंभीरशी भाजपचं बोलणं झालं’

यासंदर्भात ‘टाइम्सनाऊ’ या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. ‘भाजपच्या एका नेत्याने सांगितलं आहे की, पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी गौतम गंभीरशी बोलणी केली आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.’ दरम्यान,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -