घरदेश-विदेशपाकिस्तानी चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटले

पाकिस्तानी चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटले

Subscribe

भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटत त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या कच्छ येथील सागरी सीमेलगत पाकिस्तानच्या चोरांनी दोन भारतीय बोटींना लुटल्याची घटना समोर आली आहे. इतकचं नाही तर मच्छिमारांना मारहाण करुन त्यांच्याजवळील सामानही हिसकावून घेतल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा यंत्रणांना ही बाब लक्षात येताच त्यांना आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच सागरी बीएसएफ आणि नौदलाकडून गस्त वाढविण्यात आली आहे.

नौदलाने मच्छिमारांना दिला होता सतर्कतेचा इशारा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचे भारताकडून २६ फेब्रुवारीला ‘एअर स्ट्राईक’ करत चोखप्रत्युत्तर देण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान सागरी सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संपूर्ण देशातील महत्त्वाच्या ठिकाणी हायअलर्ट देण्यात आला होता. नौदलाने मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच नौदलाने मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देत सागरी सीमेलगत जावू नये अशा सूचना भारतीय नौदलाने दिल्या होत्या. मात्र प्रशासनाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन मच्छिमार समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्याचे समोर आले आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सीमेवर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सागरी सीमेवरही भारतीय नौदल करडी नजर ठेऊन असताना देखील या सुरक्षेला छेद देत अवैधरित्या पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय बोटींना आपलं लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

वाचा – लष्कराला मोठे यश; पुलवामा हल्ल्याच्या २ मास्टरमाईंडचा खात्मा

वाचा – बीसीसीआयने पुलवामा हल्ल्यातील शहिदांना ५ कोटींची मदत करावी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -