घरदेश-विदेशलग्नासाठी 'ती' झाली 'तो'...; पण प्रेयसी पळाली भलत्याचसोबत!

लग्नासाठी ‘ती’ झाली ‘तो’…; पण प्रेयसी पळाली भलत्याचसोबत!

Subscribe

एका तरुणीने तिच्या मैत्रिणीवर असलेल्या प्रेमापोटी लिंग बदल केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या तरुणीच्या प्रेमाकरता लिंग बदले ती तरुणींने भलत्यासोबत लग्न करत असल्याचे समोर आले आहे.

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचे आपल्या मैत्रिणीवर असलेले प्रेम मिळवण्यासाठी चक्क लिंग बदल केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे ज्या तरुणीकरता त्या मुलींने आपले लिंग बदलून मुलगा झाली आहे. मात्र त्या मैत्रिणीनेच त्याच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिच्यासाठी एवढा खटाटोप केला ती मुलगीच पळून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिच्यावर मनापासून प्रेम केले, तिच्याबरोबर पुढील आयुष्य सुखाने घालवण्यासाठी केलेले प्रयत्न तरुणीच्या चांगलेच अंगलट आले आहेत.

नेमके काय घडले?

केरळमधील कोझीकोड येथे राहणारी अर्चना राज उर्फ दिपू आणि तिची मैत्रिण या दोघींमध्ये प्रेमसंबंध होते. समलैंगिक असल्याने दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण त्यासाठी एका मुलीला आपले लिंग बदलावे लागले असते. त्यानुसार दिपूच्या मैत्रिणीने दिपूला सेक्स रिअसाईनमेंट ही शस्त्रक्रिया करावी आणि पुरुष बवाने अशी अटक दिपूसमोर ठेवली. मैत्रिणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दिपूने ती अट मान्य केली. शस्त्रक्रियेसाठी दिपून २ लाख रुपयांचे कर्ज देखील काढले आणि चैन्नईतील एका रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया करुन महिलेची पुरुष झाली. त्यानंतर दिपूने मैत्रिणीला अनेक फोन केले. मात्र तिच्या मैत्रिणींने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे दिपूने रुग्णालयातून सुट्टी मिळताच कोझीकोड गाठले. पण मैत्रिणीने दिपूला भेटण्यास नकार दिला आणि आपले एका तरुणाबरोबर लग्न ठरल्याचे तिने सांगितले. हे ऐकताच दिपू धक्काच बसला. त्यानंतर दिपूने त्या तरुणाची प्रत्यक्षात भेट घेऊन या तरुणीसोबत लग्न न करण्याचा सल्ला देखील दिला. मात्र दिपूच्या मैत्रिणींने दिपूच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे होणाऱ्या पतीला सांगत तिथून पळ काढला. यामुळे निराश झालेल्या दिपूने अखेर पोलिसात धाव घेत त्या तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. परंतु संबंधित तरुणीवर कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान पत्रकार परिषदेत दिपूने मैत्रिणीविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आगे. तसेच त्या तरुणीमुळे मी सेक्स बदल्याचा आरोप देखील दिपूने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -