घरमहाराष्ट्रख्रिसमसची प्रार्थना करताना कोल्हापूरात ख्रिश्चन बांधवाना मारहाण

ख्रिसमसची प्रार्थना करताना कोल्हापूरात ख्रिश्चन बांधवाना मारहाण

Subscribe

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातल्या कोवाड भागात ख्रिश्चन बांधवावर काही अज्ञात टोळक्याने हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण नामक व्यक्ती हे दर रविवारी स्वतःच्या घरी सामुहिक प्रार्थनेचे आयोजन करतात. २३ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे चव्हाण यांच्या घरी प्रार्थनेसाठी २० ते २५ लोक जमले होते. मात्र तेवढ्यात तोडांला रुमाल बांधलेला जमाव हातात काठ्या, गज, काचेच्या बाटल्या घेऊन तिथे पोहोचला. काही कळण्याच्या आतच या जमावाने प्रार्थना करणाऱ्या लोकांवर हल्ला करत त्यांच्या गाड्यांची देखील तोडफोड केली. या हल्ल्यामध्ये जवळपास १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत.

हल्लेखोर हे बेळगाव मधून आले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांनी दंगा भडकवणे आणि हत्येचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे अज्ञात हल्लेखोरांवर दाखल केले आहेत. पोलिस उप अधीक्षक अनिल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा तपास सुरु असून पोलिसांचे काही पथके बेळगाव, कर्नाटकात पाठवण्यात आली आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे हल्ला झाल्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

kolhapur voilence in two religious group
या हल्ल्यामध्ये जखमी झालेले नागरिक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -