घरदेश-विदेशगोध्रा हत्याकांडातील आरोपीला १७ वर्षांनंतर जामीन मंजूर

गोध्रा हत्याकांडातील आरोपीला १७ वर्षांनंतर जामीन मंजूर

Subscribe

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड व न्या. पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासोर फारूकच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. गेली १७ वर्षे फारुक कारागृहात आहे. त्याने निम्म्याहून अधिक शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याला जामीन मंजूर केला जात आहे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

नवी दिल्ली: गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात शिक्षा झालेला आरोपी फारुकला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. फारूकला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या शिक्षेविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड व न्या. पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासोर फारूकच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. गेली १७ वर्षे फारुक कारागृहात आहे. त्याने निम्म्याहून अधिक शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याला जामीन मंजूर केला जात आहे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

- Advertisement -

या जामीन अर्जाला गुजरात सरकारच्यावतीने विरोध करण्यात आला होता. साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुजरात सरकारची बाजू मांडली होती. ते म्हणाले, साबरमती एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याचा फारूकवर आरोप आहे. धावत्या रेल्वेवर दगडफेक करणे हा गंभीर गुन्हा नाही. साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लावण्यात आली होती. त्यातील प्रवाशांना बाहेर पडता येऊ नये, यासाठी आग लागलेल्या डब्यावर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत ५९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे फारुकचा गुन्हा गंभीर आहे. त्याला जामीन मंजूर करु नये. त्याच्या अपील याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. फारुक गेली १७ वर्षे कारागृहातच आहे. त्याचा जामीन मंजूर केला जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

२७ फेब्रुवारी २००२ रोजा ही घटना घडली. त्यानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या दंगलीत अनेकांचा बळी गेला. याप्रकरणाचा खटला गुजरात बाहेर चालवावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार या घटनेतील काही दोषी अधिकाऱ्यांचे खटले मुंबईत चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही या दंगलीचे आरोप होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल देत पंतप्रधान मोदी यांच्यावरील आरोप फेटाळून लावले व त्यांना क्लिन चिट देण्यात आली.

- Advertisement -

बिल्कीस बानो प्रकरण याच दंगलीत घडले. यातील दोषी आरोपींच्या सुटकेविरोधात बिल्कीस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका केली आहे. बिल्कीस बानो यांच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावर सुनावणी घेण्यास एका न्यायाधीशांनी नकार दिला आहे. त्यामुळे बानो यांच्या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठासमाेर सुनावणी होईल.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -