घरदेश-विदेशतरुणांसाठी खुशखबर! मोदी सरकार करणार 10 लाख रिक्त जागांसाठी मेगाभरती

तरुणांसाठी खुशखबर! मोदी सरकार करणार 10 लाख रिक्त जागांसाठी मेगाभरती

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्यात रोजगार मेळाव्याचे उदघाटन करणार आहेत. दरम्यान या मेळाव्यात १० लाख लोकांना रोअजगार मिळणार आहे. शनिवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात नव्याने भरती झालेल्या 75 हजार लोकांना त्यांचे नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.

‘तरुणांना रोजगार मिळण्यासाठी पंतप्रधानांनी जे वचन दिले होते त्याच्या पूर्ततेसाठी हे एक महत्वाचे पाऊल असणार आहे. यामुळे देशातील नागरिकांच्या विकासामध्येही हातभार लागणार आहे’. अश्या आशयाचे निवेदन रोजगार मेळाव्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशांनुसार सर्व मंत्र्यांच्या खात्यातील मंजूर रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या मेळाव्यातून निवडलेले कर्मचारी सरकारच्या ३८ खात्यांमधील कार्यालयात नियुक्त करण्यात येतील. या नियुक्तीसाठी ‘ग्रुप A’ , ‘ग्रुप B’ आणि ‘ग्रुप C’ असे वर्गीकरण करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान, सब इंस्पेक्टर, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए आणि आयकर निरीक्षक या पदांची भरती या रोजगार मेळाव्यातून करण्यात येणार आहे. या नियुक्त्या मंत्रालयांकडून lकिंवा यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे बोर्डाकडून करण्यात येतील. दरम्यान, ‘ग्रुप A’ मध्ये 23 हजार 584, ‘ग्रुप B’ मध्ये 26 हजार 282, ‘ग्रुप B’  मध्ये 92 हजार 525 तर ‘ग्रुप C’ मध्ये तब्बल आठ लाख 36 हजार रिक्त जागा आहेत. यातील एकट्या संरक्षण मंत्रालयात 39 हजार 366 जागा रिक्त आहेत. रेल्वे मंत्रालयात दोन लाख 91 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.


हे ही वाचा –  मिठाईवर खर्च करून लोकांचे आरोग्य जपा, फटाकेबंदीविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -