घरदेश-विदेशदहावीच्या विद्यार्थ्यांना जॅकपॉट, सगळेच होणार पास

दहावीच्या विद्यार्थ्यांना जॅकपॉट, सगळेच होणार पास

Subscribe

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स यासारख्या एच्छिक विषय विद्यार्थी घेऊ शकतात. त्याचप्रमाणे बेस्ट ऑफ ५ च्या आधारावर दहावीची टक्केवारी ठरविण्यात येणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या मुलांसाठी एक खुशखबर आणली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार दहावीतील प्रत्येक विद्यार्थी नापास होणार नाही. एखादा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान विषयात नापास झाला तर तो एच्छिक विषय घेतलेल्या विषयात पास झाला असेल तर त्याला परिक्षेत पास झाला आहे असे समजले जाईल. सीबीएसईच्या शिक्षकांचे यावर असे म्हणणे आहे की,याचा सर्वात मोठा फायदा मुलांना होणार आहे. त्यामुळे त्यांचे एक वर्ष वाया जाणार नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स यासारख्या एच्छिक विषय विद्यार्थी घेऊ शकतात. त्याचप्रमाणे बेस्ट ऑफ ५ च्या आधारावर दहावीची टक्केवारी ठरविण्यात येणार आहे.

जे विद्यार्थी हुशार असून अभ्यास थोडे मागे आहेत त्यांच्यासाठी हा नियम तयार करण्यात आला आहे. या निर्णयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून स्वागत करण्यात आले आहे. भारत सरकारच्या स्किल इंडिया इनिशिएटिव्ह समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ज्या कौशल्याच्या आधारित विषयांमध्ये रस आहे त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांचा इटरेस्ट दरवर्षी वाढत असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे. २०२० मध्ये २० टक्के विद्यार्थ्यांनी हे विषय निवडले होते. तर २०२१मध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित विषय निवडले आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे यंदा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परिक्षा कधी होतील याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून होते. त्यातच सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक ३ फेब्रुवारीला घोषित करण्यात येणार असल्याचे केंद्रिय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगतिले आहे.


हेही वाचा – इस्त्रायली दूतवास स्फोट, जैश-उल-हिंदचे कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाशी कनेक्शन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -