घरदेश-विदेशइस्त्रायली दूतवास स्फोट, जैश-उल-हिंदचे कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाशी कनेक्शन

इस्त्रायली दूतवास स्फोट, जैश-उल-हिंदचे कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाशी कनेक्शन

Subscribe

ईरानमध्ये सक्रिय जैश-उल-अद्ल

दिल्लीतील इस्त्रायली दूतवासाजवळ झालेल्या स्फोटाबाबत सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. यासोबत जैश-उल-हिंदबाबत ही तपास सुरु केला आहे. जैश-उल-हिंद संघटनेने इस्त्रायली दूतवासाजवळील स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. तपासणी संदर्भातील संस्थांनी सांगितले की यापूर्वी जैश-उल-हिंद नावाची कोणतीही संघटना नव्हती. गुप्तचर संस्थेला या संघटनेची माहिती टेलिग्रामद्वारे मिळाली आहे. टेलिग्राममध्ये मेसेजमध्ये शीर्षकात अ स्ट्राईक इन हर्ट ऑफ दिल्ली असा इंग्रजी भाषेत लिहिण्यात आले होते. तसेच इंग्रजी भाषेत मेसेज देत धमकी दिली आहे की, ही फक्त सुरुवात आहे. पुढे आम्ही मोठ्या शहरांतही स्फोट घडवून आणणार आहे. तसेच धमाका झालेल्या ठिकाणचा फोटोही ह्या संघटनेने पोलिसांना पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जैश-उल-हिंद ही संघटना जैश-उल-अद्ल या संघटनेच्या विचारधारेशी जोडला आहे.

ईरानमध्ये सक्रिय जैश-उल-अद्ल

जैश-उल-अद्ल ही ईरानमधील अतंकवादी संघटना आहे. जैश-उल-अद्लच्या संघटनेनेच भारताचे कुलभूषण जाधव यांचे ईरानच्या चाबहार पोर्टवरुन अपहरण करुण पाकिस्तानला सोपवले होते. गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी यांच्यानुसार जैश-उल-अद्ल आणि जैश-उल-अद्ल ह्या आतंकवादी संघटना ईरानच्या दक्षिणेकडील आहेत. आणि त्यांची हद्द पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेला लागून आहे. परंतु या संघटना खरच आहेत. तर भारतासाठी हा धोकादायक आहेत.

- Advertisement -

या दोन्ही संघटनांनी असा दावा केला आहे की, त्या सिस्तान आणि बलोचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. ईरानने म्हटले आहे की, ह्या संघटनेचा अल कायदाशीही जोडल्या गेल्या आहेत. या संघटनेची स्थापना २०१२ मध्ये जुंदाल्लाह नावाच्या एका सुन्नी कट्टरपंथी समूहातील लोकांनी केली होती. तसच या संघटनेला ईरानसह जापान, न्यूजीलैंड, अमेरिकामध्येही आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

कुलभूषण जाधव यांचे कसे केले अपहरण

जैश-उल-अद्लशी पाकिस्तानी आर्मी आणि तेथील गुप्तचर संस्थेचे घनिष्ठ संबंध आहेत. २०१८ साली कुलभूषण जाधव यांचे ईरानच्या चाबहार पोर्टवरुन मुल्ला उमर बलोच ईरानी नावाच्या आतंकवादीने अपहरण केले होते. मुल्ला उमर इसी जैश-उल-अद्ल संघटनेतील होती. जाधव यांचे हात बांधण्यात आले. डोळ्यावर पट्टी लावली आणि कारमध्ये ढकलण्यात आले. यानंतर ईरान-बलूचिस्तान बॉर्डवरील मश्केलमध्ये नेण्यात आले. तिथून क्वेटा आणि नंतर इस्लामाबादमध्ये नेण्यात आले. बलूच कार्यकर्ते मामा कादिर बलूच यांनी २०१८ मध्ये एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अपहरणचा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला होता.

- Advertisement -
Israeli embassy blast, Jaish-ul-Hind's connection to Kulbhushan Jadhav's abduction from chabahar port
इस्त्रायली दूतवास स्फोट, जैश-उल-हिंदचे कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाशी कनेक्शन

ISI ने जैश-उल-अद्लला दिले होते करोडो रुपये

कादीर बलूच यांनी असा दावा केला होता की, जाधवला जेश-उल-अदल ग्रुप ने ईरान के सरबाजच्या गोल्डश्मिट सीमेजवळ अपहरण केले होते. ही सीमा चाबहारपासून ५२ किमी दूरवर आहे. कुलभूषण जाधव यांना सरबाज येथे एक व्यापारी संघटनेने बोलवले होते. ही व्यापारी संघटना जैश-उल-अद्लसाठी काम करत आहे. या अपहणासाठी आईएसआईने मुल्ला उमरला अपहरणासाठी करोडो रुपये दिले होते. बलुचनुसार पाकिस्तानला माहित होते की, जाधव ईरानमध्ये एक व्यापारी आहेत. आणि ते कधीही बलुचिस्तानमध्ये आले नव्हते. त्यांचे ईरानमधून अपहरण केले होते. यानंतर आईएसआईने दावा केला कि त्यांनी कुलभूषण जाधव यांना बलूचिस्तानमधून पकडले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -