घरदेश-विदेशआजपासून टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन होणार स्वस्त

आजपासून टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन होणार स्वस्त

Subscribe

मध्यवर्गीयांकरता खूश खबर. टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन, व्हॅक्युम क्लिनर्स आणि फ्रिज या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील जीएसटीत घट झाली आहे. त्यामुळे दैनंदिन वापरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आजपासून स्वस्त होणार आहेत.

आजपासून टीव्ही, एसी आणि वॉशिंग मशिन स्वस्त होणार आहेत. येत्या काही दिवसात या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर प्रथमच ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कमी दराने विकत घेता येणार असल्याचे जेटली यांने सांगितले.

सरकारी तिजोरीला मात्र फटका

देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक गृहपयोगी वस्तूंवर आणि उपकरणांवर तब्बल ३१ टक्के कर आकारला जात होता. मात्र जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर वर्षभरात ३८४ वस्तूंवरील कर कमी झाला आहे. तर २८ टक्क्यांच्या स्तरांतील अनेक वस्तूंवरील कर टप्प्या टप्प्याने कमी केले जात आहेत. मोठ्या आकाराचे टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन, फ्रिज आणि व्हॅक्युम क्लिनर्स या दैनंदिन घरगुती वापराच्या वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत. या कर कपातीचा मध्यमवर्गीय ग्राहकांना नक्कीच  फायदा होणार आहे. मात्र याचा फटका सरकारी तिजोरीला बसण्याची शक्यता आहे. मागच्या आठवड्यात जीएसटी परिषदेने घेतलेल्या बैठकीत एकूण ८५ वस्तूवरील कर कपात करण्याचे घोषित केले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारवर आर्थिक बोजा

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर राज्य सरकारला महसुली फटका बसू नये या हेतूने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना दरवर्षी १४ टक्के महसूल वाढीची हमी दिली आहे. तसेच अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने केंद्र सरकारवरील आर्थिक बोजा वाढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -