घरदेश-विदेशगुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर; आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर; आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू

Subscribe

गुजरामध्ये गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे दक्षिण गुजरातमध्ये पूर आला असून १५ गावांचा संपर्क तुटला आहे. तर ३० लोकांचा मृत्यू झाला आहे पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

गुजरातमध्ये गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे दक्षिण गुजरातच्या ७ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. तर आतापर्यंत ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफच्या २० टीम पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत एनडीआरएफने ४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. काही ठिकाणी पूरामुळे रेल्वेचे ट्रॅक वाहून गेले आहेत. त्यामुळे ६ पेक्षा जास्त रेल्वे अडकल्या आहेत.

पूरामुळे १५ गावांचा संपूर्क तुटला

मुसळधार पावसामुळे दक्षिण गुजरातमधील ११३ गावांमधील वीज सेवा खंडीत करण्यात आली आहे. तर पूरामुळे १५ गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे आलेल्या पूरामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे. जेतपूर-सोमनाथ हायवे पूरामुळे वाहून गेला आहे. येत्या दोन दिवासात सौराष्ट्र, दक्षिण गुजरात मे मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अहमदाबाद, उत्तर गुजरात आणि कच्छमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

अमरेली आणि नवसारीमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद

बुधवारी सकाळपर्यंत म्हणजे २४ तासात पोरबंद आणि द्वारकामध्ये १९७ मिमी, जुनागढमध्ये २८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर नवसारीमध्ये २४५ मिमी आणि डांगमध्ये २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत गिर-सोमनाथ, अमरेली, नवसारी आणि डांग येथे सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -