घरक्रीडासचिन आता क्रिकेटर घडवणार!

सचिन आता क्रिकेटर घडवणार!

Subscribe

सचिन तेंडुलकर आता ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देणार आहे. यासाठी इंग्लंडच्या 'मिडलसेक्स क्लब'सोबत त्याने करार केला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता नव्या रुपात लोकांच्या समोर येणार आहे. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आता लवकरच क्रिकेटर घडवणार आहे. सचिनने इंग्लंडच्या ‘मिडलसेक्स क्लब’सोबत करार केला आहे. या करारानुसार लवकरच इंग्लंडमध्ये ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमी’ सुरु होणार आहे. सचिनने स्वत: ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे.

लंडन आणि मुंबईतच कार्यशाळा होणार

सचिनसोबतच इतर दिग्गज क्रिकेटर या अॅकॅडमीमध्ये ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलं-मुलींना क्रिकेट संबंधी मार्गदर्शन करणार आहेत. सचिन आणि त्याने करार केलेल्या  ‘मिडलसेक्स क्लब’ची पहिली कार्यशाळा ६ ऑगष्ट ते ९ ऑगष्ट दरम्यान लंडनच्या नॉर्थवूड येथील मर्चन्ट टेलर या शाळेमध्ये होणार आहे. या कार्यशाळा साधारणत: लंडन आणि मुंबईमध्येच आयोजित करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सुजान जागतिक नागरिक घडवण्याचा हेतू

या उपक्रमावर बोलताना सचिनने सांगितले की, ‘मिडलसेक्ससोबत हा नवा उपक्रम सुरु करायला मला आनंद होत आहे. या उपक्रमाचा फक्त चांगले क्रिकेटर घडवणे हाच हेतू नसून भविष्यात सुजान जागतिक नागरिक घडवणे हा देखील मुख्य हेतू आहे. या उपक्रमातर्फे मी माझ्याकडुन शक्य तितके मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करेल’.

सचिनचे ट्विट

सचिनने आज दुपारीच याबाबतीत ट्वीट करुन माहिती दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -