घरदेश-विदेशबलात्कारातील दोषीला ३० दिवसांत जन्मठेपेची शिक्षा, तीन मुलांचा बाप आहे आरोपी

बलात्कारातील दोषीला ३० दिवसांत जन्मठेपेची शिक्षा, तीन मुलांचा बाप आहे आरोपी

Subscribe

गुजरातमधील विशेष न्यायालयाने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लैंगिक गुन्ह्यांतील बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांतर्गत खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यामुळे बलात्काराच्या आरोपीला अटक केल्यानंतर विक्रमी ३० दिवसांच्या आत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अजय निषाद असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी.एस.काला यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी अजय निषादला सुरत पोलिसांनी १३ ऑक्टोबरला अटक केली होती. न्यायालयाने त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

- Advertisement -

घराजवळ खेळणाऱ्या मुलीचे केले अपहरण

आरोपी अजय निषाद विवाहित असून तो स्वतः तीन मुलांचा बाप आहे. आरोपीने १२ ऑक्टोबर रोजी सचिन जीआयडीसी परिसरात घराजवळ खेळत असलेल्या एका लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु असताना ती मुलगी एका निर्जन स्थळी सापडली.

आरोपी अजय निषाद याला अटक केल्यानंतर दहा दिवसांच्या आत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले, यानंतर  २५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सुनावणीनंतर आणि अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांच्या आत आरोपी म्हणून घोषित केले.

- Advertisement -

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील कनिष्ठ न्यायालयाने इतक्या कमी वेळेत निकाल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका वकिलाने सांगितले की, या प्रकरणातील सुनावणीदरम्यान काही दिवस असे होते की, रात्री १२ वाजेपर्यंत न्यायालय सुरू होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -