घरताज्या घडामोडीओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा गोळीबारात मृत्यू

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा गोळीबारात मृत्यू

Subscribe

ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलिसाने रविवारी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नाबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ ही घटना घडली. एएसआय गोपाल दास असे गोळीबार करणार्‍या पोलिसाचे नाव आहे. तो गांधी चौक पोलीस चौकीत तैनात होता. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नाबा दास यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात नाबा दास यांच्या छातीत ४-५ गोळ्या घुसल्या होत्या. या हल्ल्यानंतर नबा दास यांना तातडीने विमानाने भुवनेश्वरला नेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री नाबा दास हे एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बृजराजनगरमध्ये आले होते. सुमारे 11 वाजेच्या सुमारास ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. नाबा दास कारमधून उतरत असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार केल्यानंतर गोपाल दास तिथून पळून गेला. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -