घरदेश-विदेशविविध मागण्यांसाठी हॉलिवूडच्या कलावंतानी उपसले संपाचे हत्यार

विविध मागण्यांसाठी हॉलिवूडच्या कलावंतानी उपसले संपाचे हत्यार

Subscribe

आॅस्कर पुरस्कार विजेते अभिनेतेही संपात सहभागी

दिल्ली ः हाॅलीवुड चित्रपटसृष्टीवर सध्या संकटाचे ढग दाटले आहेत. कारण, या चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱया कलावंत, कामगारांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून, यामध्ये विविध संघटनांसह आॅस्कर पुरस्कार विजेत्या कलावंतांनीही सहभाग नोंदविला आहे. याचा परिणाम या संपूर्ण चित्रपटसृष्टीवर होत असून, यामुळे अनेक प्रोडक्शन हाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

ब्लुमर्ग या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हाॅलीवूडचे लेखक आणि कलावंत हे एकाचवेळी ६३ वर्षानंतर पहिल्यांदा उपोषणास बसले आहेत. स्क्रीन एक्टर्स गिल्ड ही संस्था एक लाख ६० हजार कलाकारांचे प्रतिनिधीत्व करते. या संस्थेनेसुद्धा शुक्रवारी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेत आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वावर झाला असून, अनेकांच्या रोजगारावर कुऱहाड येण्याची शक्यता आहे. 2 मेपासून राइटर्स गिल्ड ऑफ अमेरिका या संस्थेने उपोषणास सुरुवात केली होती. यामुळे अनेक टिव्ही कार्यक्रम बंद करण्यात आले होते. या उपोषणास जेन फोंडा, सुज़ैन सरंडन, रॉब लोव आणि मार्क रफालो या लोकप्रिय सिनेकलावंतानी समर्थन दर्शविले आहे.

- Advertisement -

या कारणांमुळे सुरु करण्यात आला संप
हाॅलीवुड चित्रपटसृष्टीमुध्ये काही कालवंत अगदी ८०-९०च्या दशकापासून काम करत आहेत. ते सध्या त्यांचे वेतन वाढवून द्यावे यासाठी विविध मार्गानी मागणी करीत आहेत. वेतनवाढीसोबतच आम्हाला आश्वासन द्याकी, आमची नोकरी जाणार नाही. असेही या संप कऱयांचे म्हणणे आहे.

1960 मध्ये झाले होते कामबंद आंदोलन
याआधी हाॅलीवूडचे कलावंत हे 1960 मध्ये संपावर गेले होते. यामध्ये सर्वाधिक लेखक आणि अभिनेत्यांचा समावेश होता. ते टिव्हीवर प्रसारित होणाऱया चित्रपटावरील महसुलासाठी लढत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -