घरताज्या घडामोडी...तर अंतराळात माणसचं एकमेकांना खातील...शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

…तर अंतराळात माणसचं एकमेकांना खातील…शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

Subscribe

भविष्यात अंतराळात स्थलांतरीत होण्याचे स्वप्न मानव बघत आहे. त्यानुसार प्रयत्नही केले जात असल्याच्या बातम्या आपण वाचल्याही असतील. पण खरचं हे इतकं सोप आहे का? तर नाही. कारण भूक लागल्यावर तिथे खाण्यासाठीच काही नसल्याने माणसांना एकमेकांना खाण्याशिवाय पर्यायच नाहीये. खु्द्द शास्त्रज्ञांनीच हे उत्तर दिलं आहे.

शास्रज्ञांच्या मते अंतराळात मानव जाऊ शकतो पण वास्तव्य करणं आव्हानात्मक आहे कारण तिथे तो खाणार काय हा प्रश्न आहे. गुरुचा उपग्रह कॅलिस्टो आणि शनिचा उपग्रह असलेल्या टायटन या ग्रहावर मानवी वस्ती वसवण्यावर सध्या संशोधन सुरू आहे. त्यावर बोलताना तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केलं आहे. तसेच प्रायोगिकतत्वावर चंद्र किंवा मंगळावर सर्वप्रथम मानवी वसाहत उभारावी जेणेकरुन या दोन्ही गृहांवर कसलीही कमतरता किंवा अत्यावश्यक परिस्थिती निर्माण झाल्यास पृथ्वीवरून त्यानुसार मदत पाठवणे शक्य होऊ शकते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. Metro.co.uk च्या अहवालानुसार अशा ग्रहांवर मानवी वसाहत निर्माण केल्यास अन्नपदार्थांची टंचाई आणि आजारपणाचा धोका कायम राहू शकतो. कारण पृथ्वीवरून मदत पाहोचण्याचा कालावधी हा वर्षभराचाही असू शकतो. असे शास्रज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -