घरदेश-विदेशPfizer CEO असलो तरीही, लस टोचण्यासाठी मी रांग तोडणार नाही

Pfizer CEO असलो तरीही, लस टोचण्यासाठी मी रांग तोडणार नाही

Subscribe

जगभरात कोरोना लस निर्मात्या कंपन्यांपैकी एक Pfizer चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अल्बर्ट बोर्ला यांनी जगापुढे एक नवा चांगला आदर्श कोरोना लस वितरणाच्या विषयाच्या निमित्ताने घालून दिला आहे. मी काही फ्रंटलाईन वर्कर नाही, म्हणूनच मी रांग मोडणार नाही. मला आताच्या घडीला कोरोनाची लस टोचून घेण्याचा कोणतीही गरज वाटत नाही अशा शब्दातच त्यांनी एक चांगला आदर्श सीईओ म्हणून ठेवला आहे.

मी ५९ वर्षीय असलो तरीही माझी तब्येत चांगली आहे. मी फ्रंटलाईन वर्कर नाही. जरी मी सीईओ असलो तरीही मी रांग मोडणार नाही. Pfizer कंपनीकडून नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये कंपनीच्या सीईओने लस घेतल्यास अधिकाधिक लोक लस टोचून घेण्यासाठी पुढे येतील असे त्या सर्वेणातून लोकांनी मत मांडले होते. त्यामुळेच कंपनीसह लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी मी लस टोचून घेण्यासाठी कोणती वेळ योग्य असेल याची सध्या वाट पाहतो आहे, असे सीईओंनी स्पष्ट केले आहे. सेंटर फॉर डिझिज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंन्शनच्या सल्लागार समुहाने स्पष्ट केले आहे की नर्सिंग होम आणि आरोग्य कर्मचारी यांना पहिल्यांदा लस देण्याची गरज आहे. त्यामुळेच या फ्रंटलाईन वर्कर्सना पहिल्यांदा लस टोचण्याची गरज असल्याचे या सीईओंनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

स्वतः Pfizer कंपनीचे सीईओ असले तरीही त्यांनी अद्यापही लस घेतली नाही. जेव्हा माझी वेळ नियमानुसार येईल तेव्हाच मी लस घेईन असे मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे. पण लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी जेव्हा लस घेण्याची वेळ येईल त्यावेळी मी स्वतः लस टोचून माझे योगदान देईन असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर मी सध्याची फ्रंट लाईन वर्करची लाईन मोडून लस घेतली तर याचा वाईट पायंडा पडेल. तसेच समाजात माझी अशी वर्तवणुक योग्यही दिसणार नाही. त्यामुळेच मी नक्कीच असा चुकीचा निर्णय घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -