घरदेश-विदेशRussia Ukraine War : भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हवाई दल सज्ज; C17 ग्लोबमास्टरचे...

Russia Ukraine War : भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हवाई दल सज्ज; C17 ग्लोबमास्टरचे रोमनियाला उड्डाण

Subscribe

युक्रेनमधील खारकीव येथे रशियन हल्ल्यात भारतीय विद्यार्थी नवीनचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ऑपरेशन गंगा अधिक तीव्र केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत भारत 28 फेब्रुवारी ते 8 मार्च पर्यंत बुडापेस्ट, बुखारेस्ट आणि इतर ठिकाणी एकूण 46 विमान पाठवणार आहे.

युद्धभूमी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ आता अधिक तीव्र केले आहे. याअंतर्गत आता भारतीयांना परत आणण्यासाठी पुढील 3 दिवस 26 फ्लाईट शेड्यूल केल्या आहेत. इतकेच नाही तर भारतीय हवाई दल देखील आता ऑपरेशन गंगामध्ये सामील झाले आहे. यामुळे भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हवाई दल सज्ज झाले आहे. हवाई दलाचे C-17 एअरक्रॉफ्ट रोमानियात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणणार आहे.

युक्रेनमधून रोमानियाला पोहचलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी हवाई दलाचे C-17 एअरक्रॉफ्ट रवाना झाले आहे.
C-17 ग्लोबमास्टरने हिंडन एअरबेसवरून रोमानियासाठी उड्डाण केले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रोमानियातील बुखारेस्ट विमानतळावर पोहोचत भारतीयांशी संवाद साधला आहे.

- Advertisement -

युक्रेनमधून 60 टक्के भारतीयांना बाहेर काढण्यात यश

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय अडकले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत 12000 भारतीयांनी युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण भारतीयांचे प्रमाण हे 60 टक्के इतके आहे. उर्वरित 40 टक्क्यांपैकी निम्मे खार्किवमध्ये अडकले आहेत. उर्वरित इतर नागरिक युक्रेनच्या संघर्ष क्षेत्राच्या बाहेर आहेत.

आता कीवमध्ये एकही भारतीय नाही

हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, आमच्या सर्व भारतीय नागरिकांनी कीव शहर सोडले आहे, आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, कीवमध्ये एकही भारतीय नागरिक नाही, तिथून आमच्याशी कोणीही संपर्क साधला नाही.

- Advertisement -

सरकार 8 मार्चपर्यंत 46 विमानं पाठवणार

युक्रेनमधील खारकीव येथे रशियाच्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थी नवीनचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन गंगा’ अधिक तीव्र केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारत 28 फेब्रुवारी ते 8 मार्च पर्यंत बुडापेस्ट, बुखारेस्ट आणि इतर ठिकाणी एकूण 46 विमान पाठवणार आहे.

कुठून, किती फ्लाइट उड्डाण करतील?

एकूण 29 विमानं बुखारेस्टसाठी उड्डाण करतील. यामध्ये 13 एअर इंडिया, 8 एअर इंडिया एक्स्प्रेस, 5 इंडिगो, 2 स्पाइसजेट आणि एक भारतीय वायुसेनेची विमान असेल. त्याचवेळी 10 विमानं बुडापेस्टला जातील. यात 7 इंडिगो, 2 एअर इंडिया आणि एक स्पाईसजेटच्या विमानांचा समावेश आहे. Rzeszow पोलंडसाठी इंडिगोच्या 6 विमान जातील, तर स्पाइसजेटचे एक विमान कोसिसला उड्डाण करेल.

एअर इंडियाच्या विमानाची क्षमता 250 प्रवाशांची असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसची क्षमता 180, इंडिगो 216 आणि स्पाइस जेटची क्षमता 180 प्रवासी आहे.


Russia Ukraine War : युक्रेनविरुद्ध व्लादिमीर पुतिनची 5T रणनिती, कीववर कब्जा करण्याचा महत्त्वाचा भाग

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -