घरताज्या घडामोडीRussia Ukraine War : युक्रेनविरुद्ध व्लादिमीर पुतिनची 5T रणनिती, कीववर कब्जा करण्याचा...

Russia Ukraine War : युक्रेनविरुद्ध व्लादिमीर पुतिनची 5T रणनिती, कीववर कब्जा करण्याचा महत्त्वाचा भाग

Subscribe

नाटो आणि युरोपियन संघात युक्रेनला सहभागी व्हायचे आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्रेनला सहभागी होऊ द्यायचे नाही. तसेच युक्रेनचे दोन भाग करण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा तिसरा पर्याय आहे. चौथ्या पर्यायामध्ये युक्रेनवर प्राणघातक शस्त्रे वापरण्याचा आहे. रशियाकडून अण्वस्त्र वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

रशिया युक्रेनमध्ये गेल्या ६ दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशियाचे सैन्य रशियातील रुग्णालये आणि शासकीय इमारतींना लक्ष्य करुन उद्ध्वस्त करण्यात येत आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये रशियाचे सैन्य पसरले आहेत. हवाई आणि जमिनीवरील संघर्ष तीव्र झाला असल्याचे दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्धच्या लढ्यासाठी 5T रणनिती आखली आहे. यामध्ये युक्रेनवर ताबा मिळवणे हा महत्त्वाचा भाग आहे. रशियाचे टँक आणि रणगाडे कीवमध्ये दाखल झाले असून युक्रेनच्या सैन्य तळावर हल्ला करुन ७० पेक्षा जास्त युक्रेनी सैनिकांना मारण्यात आले आहे.

रशियाच्या सैन्याला युक्रेनचे सैनिक जबरदस्त प्रत्युत्तर देत आहेत. तसेच रशिया अद्याप युक्रेनवर ताबा मिळवू शकला नाही. यामुळे हे युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. युरोपियन देशांकडून निर्बंध लागू करण्यात येत असल्यामुळे पुतिन अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकतात. युक्रेनला गुडघे टेकण्यासाठी पुतिन प्रयत्न करत आहेत परंतु तसे होत नाही आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या हल्ल्यापासून आतापर्यंतच्या कृती पाहिल्या तर त्या पुतिन यांच्या 5T रणनीतीचा भाग असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

संवादातून युद्ध थांबवण्याचे प्रयत्न

युक्रेन आणि रशियात सुरु असलेले युद्ध थाबंवण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांच्याकडे चर्चेचा पर्याय आहे. पुतिन यांचा पहिला प्रयत्न म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणे आहे. रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळामध्ये चर्चेची पहिली फेरी झाली आहे. परंतु यातून काही निष्कर्ष निघाला नाही.

हल्ला थांबवण्यासाठी पुतिन यांनी तीन अटी ठेवल्या होत्या –

1. युक्रेनने कोणत्याही युरोपीय संघटनेचा भाग बनू नये,
2. क्रिमियावर रशियाची सत्ता स्वीकारावी आणि
3. युक्रेनने आपल्या सैन्याला शस्त्रे ठेवण्याचे आदेश दिले होते – ज्या युक्रेनने ठामपणे नाकारल्या आहेत. मात्र, रशियाला अजूनही हा प्रश्न चर्चेतून सोडवायचा आहे आणि त्यामुळेच 2 मार्च रोजी दोन्ही देशांदरम्यान दुसरी बैठक होणार आहे.

- Advertisement -

कीववर ताबा मिळवण्याची रणनिती

चर्चेनंतरचा दुसरा पर्याय म्हणजे युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेणे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या कीव शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कीव युक्रेनची राजधानी असल्यामुळे रशिया हे शहर ताब्यात घेऊन सरकार बनवू शकते. यानंतर रशियाचा युक्रेनवर अधिकार प्रस्थापित होईल. नाटो आणि युरोपियन संघात युक्रेनला सहभागी व्हायचे आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्रेनला सहभागी होऊ द्यायचे नाही. तसेच युक्रेनचे दोन भाग करण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा तिसरा पर्याय आहे. चौथ्या पर्यायामध्ये युक्रेनवर प्राणघातक शस्त्रे वापरण्याचा आहे. रशियाकडून अण्वस्त्र वापरण्यात येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : Russia-Ukraine War: युक्रेनच्या या पाच शहरांवर रशिया ताबा करण्याची शक्यता, जाणून घ्या कारण?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -