घरमहाराष्ट्रनाशिकआयटी पार्कला परवानगी देईलच, पंतप्रधानांनाही आणेल, राणेंच आश्वासन

आयटी पार्कला परवानगी देईलच, पंतप्रधानांनाही आणेल, राणेंच आश्वासन

Subscribe

केंद्रियमंत्री नारायण राणे यांची घोषणा : प्रस्ताव सादर करण्याचे महापालिकेला निर्देश

नाशिक : भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत मिशनमुळे अनेक क्षेत्रात वाढलेली गरज बघता, आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेत आयटी उद्योग महत्वाचा पाया आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असे सांगतानाच नाशिकमध्येही आयटी पार्क उभारण्याची घोषणा केंद्रिय लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नाशिक येथे महापालिकेच्या वतीने आयोजित आयटी चर्चासत्रात केली. हा प्रकल्प देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील उद्घाटनासाठी नाशिकमध्ये आणेल, असं आश्वासन राणे यांनी दिलं. कमीत कमी वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

नाशिक महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणार्‍या आयटी हबसाठी आयटी कंपन्यांचे चर्चासत्र पार पडले. यावेळी राणे बोलत होते. या परिषदेत आयटी कंपन्यांच्या संचालकांनी काही मागण्या राणे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर राणे म्हणाले, काम करण्यासाठीच मला केंद्रात मंत्री बनवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे आपण सांगण्यापेक्षा आम्ही स्वतःहून ते करणं आमची जबाबदारी आहे. आयटी इंडस्ट्रीचा विकास व्हावा, चांगले उद्योजक घडावेत, दरडोई उत्पन्न वाढावे, देशाचा जीडीपी कसा वाढेल या दृष्टीकोनातून काम करायला हवे. नाशिकच्या विकासासाठी काम करणे महापालिकेचे काम आहे.

- Advertisement -

प्रत्येक नगरसेवकाने एक ट्रस्टी म्हणून काम केले पाहिजे. शहरातील जनतेला चांगल्या सुविधा कशा देऊ शकतो, याचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. आधुनिक टेक्नॉलॉजी ही भारताचं भविष्य घडवणारी क्षेत्र आहे, असे सांगतानाच आज अमेरिका, जपान, जर्मनी, चीन सर्वात पुढे आहे. आपणही या देशांच्या स्पर्धेत असावं या भावनेतून आपण काम करायला हवं. यासाठी एमएसएमईच्या माध्यमातून देशात उद्योगांना चालना दिली जातेय. भिवंडी शहरातून ५०० एकर जागेवर आयटी पार्क साकारण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. नाशिक महापालिकेनेही कमीत कमी वेळेत आयटी पार्क कसे उभे राहू शकते यादृष्टीने प्रस्ताव सादर करावा, आपण त्याला मंजुरी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. काही जागतिक उदाहरणे देताना आयटी इंडस्ट्री आल्यास उद्योगधंदेही येतील ज्याव्दारे विकासच होईल, असे ते म्हणाले.

व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे नाशिक सहप्रभारी जयकुमार रावल, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, आमदार देवयानी फरांदे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, सभागृह नेता कमलेश बोडके, भाजप गटनेते अरुण शेलार, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन, प्रकाश पाठक यांसह उद्योजक, आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  पालकत्व स्विकारावं 

पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरं दत्तक घेतलं. त्यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिकमध्ये विशेष प्रकल्प साकारण्यात आले. निओ मेट्रो, सिटी लिंक बससेवांच्या माध्यमातून नाशिकचा झपाट्याने विकास होतोय. फडणवीस यांनी शहर दत्तक घेतल्याने विकास होतो आहे. तसंच आपणही आयटी पार्कचं पालकत्व स्विकारावं, अशी विनंती आमदार देवयांनी फरांदे यांनी केंद्रिय मंत्री नाराण राणे यांना केली. राणे यांनीही आपण आयटी पार्कसाठी सर्वेतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. :आ. फरांदे

डिजिटल इंडियाला बळ

आयटी हब उभारणारी नाशिक महापालिका ही देशातील पहिली महापालिका असून या माध्यमातून पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाला बळ मिळत असल्याचे प्रतिपादन भाजपचे नाशिक सहप्रभारी जयकुमार रावल यांनी केले. भविष्यातील नाशिक कसे असावे याची सुरुवात भाजपने नाशिकमधील सत्ताकाळात केल्याचे त्यांनी सांगितले. निओ मेट्रो, सिटी लिंकच्या माध्यमातून दळवळणाच्या चांगल्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हैदराबाद, बंगलोर येथे गर्दी वाढू लागल्याने नाशिक हे भविष्यातील आयटी डेस्टिनेशन म्हणून नावारूपास येत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येणार्‍या विकासकामांचा आढावा घेतला. -रावल

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -