घरताज्या घडामोडीSoil Test : शेतकऱ्यांना मातीची गुणवत्ता कळणार ९० सेकंदामध्ये, IIT कानपुरचे संशोधन

Soil Test : शेतकऱ्यांना मातीची गुणवत्ता कळणार ९० सेकंदामध्ये, IIT कानपुरचे संशोधन

Subscribe

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपुर (IIT Kanpur) ने स्मार्टफोनच्या माध्यमातून शेतीसाठी एक अत्यंत उपयुक्त असे मोबाईल एप्लिकेशन विकसित केले आहे. स्मार्टफोनच्या मदतीने या एपच्या माध्यमातून अवघ्या ९० सेकंदांमध्ये मातीचे गुणवत्ता परीक्षण करता येणार आहे. आयआयटी कानपुरने असा पहिला वहिला प्रयोग करत स्मार्टफोनवर आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही शेतातील मातीची गुणवत्ता परीक्षाणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मातीच्या परीक्षणासाठी एपच्या वापरासोबतच ५ ग्रॅम मातीचा उपयोग करावा लागतो. आयआयटी कानपुरने केलेल्या दाव्यानुसार हा पहिलाच आविष्कार आहे. या तंत्रज्ञानामध्ये इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारेच मातीच्या गुणवत्ता परीक्षणाचा अहवाल मिळतो.

- Advertisement -

आयआयटी कानपुरने तयार केलेले हे एप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवर भू परीक्षक नावाने उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान पोर्टेबल स्वरूपाचे आहे. या एप्लिकेशनच्या मदतीनेच पोर्टेबल माती परीक्षण उपकरण तंत्रज्ञानासाठी पाच ग्रॅम सुक्या मातीचा वापर करावा लागतो. माती गुणवत्ता परीक्षणासाठी उपकरणात टाकल्यानंतर 90 सेकंदामध्ये मातीचे विश्लेषण करण्याची सुरूवात करतो. विश्लेषणानंतर परीक्षणाच्या रूपात मातीचा गुणवत्तेचा अहवाल स्क्रिनवर दिसतो.

आयआयटी कापुरचे संचालक अभय करंदीकर यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आपल्या सर्वांचे पालनपोषण करतात, पण तरीही अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा कठीण परिस्थितीतही मातीच्या गुणवत्ता परीक्षणासाठी अनेक दिवस शेतकऱ्यांना वाट पहावी लागते. पण यापुढे अशी समस्या उद्भवणार नाही. आमच्या टीमने अशा प्रकारच्या उपकरणाची निर्मिती केल्याचा अभिमान आहे. यामुळे मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -