घरताज्या घडामोडीMLC Election Result 2021: नागपूरमध्ये भाजपनं गड राखला, चंद्रशेखर बावनकुळे १७६ मतांनी...

MLC Election Result 2021: नागपूरमध्ये भाजपनं गड राखला, चंद्रशेखर बावनकुळे १७६ मतांनी विजयी, खंडेलवाल अकोल्यातून विजयी

Subscribe

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीत नागपूर आणि अकोल वाशिम बुलढाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक घेण्यात आली होती यातील २ प्रत्यक्ष तर ४ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. नागपूरमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे तर अकोलामध्ये भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे. भाजपने नागपूरमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवलं असून गडसुद्धा राखला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे ३६२ मिळाले असून १७६ मतांनी विजयी झाले आहेत. तर वसंत खंडेलवाल यांनी ४४३ मत मिळवत विजय प्राप्त केला आहे.

विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोल्यातील जागांवरील निवडणुकीचे निकाल हाती आहेत. अद्याप विजयाची घोषणा करण्यात आली नाही. परंतु नागपूरमधून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर अकोल्यातून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. नागपूरमध्ये काँग्रेस उमदेवार मंगेश कदम आणि अकोल्यात शिवसेनेचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे १६ मत फोडण्यात भाजपला यश मिळालं आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र भोयर यांना १ मत मिळाल आहे.

- Advertisement -

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मत मिळाली असून १७६ मतांनी विजयी झाले आहेत. बावनकुळेंना आव्हान देणाऱ्या मंगेश कदम यांना १८६ मत मिळाली आहेत. दरम्यान महाविकास आघाडीकडे २०२ मते होती यापैकी काही मते भाजपने फोडली आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसनं रविंद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. परंतु ऐनवेळी अपक्ष उमेदवार मंगेश कदम यांना पाठिंबा देण्यात आला होता. निवडणुकीत रविंद्र भोयर यांना १ मत मिळालं आहे.

अकोल्यातही भाजपचा उमेदवार विजयी

अकोला वाशिम बुलढाणामध्ये भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे. वसंत खंडेलवाल आणि गोपिकीशन बाजोरिया यांच्यात चुरस निर्माण झाली होती. शिवसेनेचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया यांना ३३४ मत मिळाली आहेत. तर वसंत खंडेलवाल यांना ४४३ मत मिळाली असून १८६ मतांनी खंडेलवाल यांचा विजय झाला आहे. गोपिकीशन बाजोरिया मागील ३ टर्मपासून स्थानिक स्वराज्य संस्थेवर होते परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. तीन वेळा गोपिकीसन बजोरिया सेनेचे विधानपरिषद सदस्य होते यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा झटका आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नागपूरसह अकोल विधानपरिषद निवडणुकीचा आज निकाल, भाजप-शिवसेना-काँग्रेस कोण बाजी मारणार?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -