घरदेश-विदेशभारत नरसंहार घडवणार -इम्रान खान

भारत नरसंहार घडवणार -इम्रान खान

Subscribe

चीन पाकिस्तानच्या मदतीला

भारत सरकार जम्मू-काश्मीरमध्ये नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत आहे. स्रेब्रेनिकामधील हत्याकांडाप्रमाणे काश्मीरमध्ये मुस्लिमांची हत्या होऊ शकते. काश्मीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाहीतर जगभरातील मुस्लिमांमध्ये कट्टरता वाढून हिंसाचाराचे सत्र सुरू होईल, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. काश्मीरबाबत मदतीचे वाडगं जगभरात फिरवूनही पाकिस्तानला प्रतिसाद मिळाला नाही. चीन आणि तुर्कस्तान सोडले तर कोणीही त्यांना जवळ उभे केले नाही. त्यामुळे आता पाकिस्तान भारतावर खोटे आरोप करत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीननंही पाकिस्तानच्या आवाजाला प्रतिसाद देत काश्मीरच्या मुद्याची दखल घेण्याचं आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या मुद्यावर बैठक बोलावण्याची मागणी चीनने आता केली आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानच्या तक्रारी ऐकाव्यात, असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात 16 ऑगस्ट रोजी यूएनएससीमध्ये बैठक होणार आहे. चीनकडून अधिकृतरित्या पोलंडला पत्र लिहिण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये कौन्सिल चेअरमनचे अध्यक्षपद त्यांना मिळणार आहे. या प्रकरणात संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्‍याच्या मते, चीनच्या या मागणीचा विचार केला जात आहे. तत्पूर्वी चीनकडून या मुद्यावर भारत-पाकिस्तानने शांतता ठेवण्याची आशा व्यक्त करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -