घरदेश-विदेशशहरापेक्षा जास्त गावात पाहिला जातो टीव्ही - बार्कचा सर्व्हे

शहरापेक्षा जास्त गावात पाहिला जातो टीव्ही – बार्कचा सर्व्हे

Subscribe

शहरी लोकांच्या तुलनेत ग्रामीण भारतामध्ये राहणारे लोक जास्त टीव्ही पाहतात असं बार्कच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. बिहार - झारखंडमध्ये सर्वात कमी टीव्ही सेट्स.

तंत्रज्ञान विकसित झालं आहे. सध्या मोबाईलवरच मालिका आणि इतर कार्यक्रमही पाहिले जातात. मात्र तरीही टेलिव्हिजनची क्रेझ कमी झालेली नाही. टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये वाढच होत आहे. मात्र शहरी लोकांच्या तुलनेत ग्रामीण भारतामध्ये राहणारे लोक जास्त टीव्ही पाहतात असं बार्कच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. टीव्ही पाहणाऱ्या लोकांच्या संख्येत २०१६ च्या तुलनेमध्ये साधारण ७.२ टक्के वाढ झाली आहे. २०१६ मध्ये साधारण ८३६ दशलक्ष व्ह्यूअरशिप नोंदवण्यात आली होती. तर आता व्ह्यूअरशिपच्या बाबतीत ग्रामीण भागांनी शहरांना पिछाडीवर टाकलं आहे. शहरी भागात चार टक्के वाढ झाली असून, ग्रामीण भागामध्ये १० टक्के वाढ झाली असल्याचं सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.

बिहार – झारखंडमध्ये सर्वात कमी टीव्ही

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडिया (बीएआरसी) च्या अहवालानुसार, बिहार – झारखंडमध्ये टीव्हींची संख्या कमी आहे. केवळ ३० टक्के घरांमध्येच टीव्हीचा सेट आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडची स्थितीही काही खास नाही. या दोन्ही राज्यांत मिळून फक्त ४५ टक्के टीव्ही सेट्स आहेत.

- Advertisement -

दक्षिण भारतानं मारली बाजी

बार्कच्या आकडेवारीनुसार, दक्षिण भारतानं बाजी मारली आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटकमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये टेलिव्हिजन सेट्स आहेत. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये दोन वर्षांपूर्वी ८० ते ९० टक्क्यांदरम्यान टीव्ही सेट्स होते.

देशात दोन टक्क्यांनी वाढले टीव्ही

बार्कनं दिलेल्या अहवालानुसार, भारतात एकूण ६६ टक्के घरांमध्ये टीव्ही सेट्स आहेत. २०१६ मध्ये हा आकडा केवळ ६४ टक्के होता. मराराष्ट्र राज्यात याचा टक्का जास्त वाढला आहे. पहिले ६० ते ७९ टक्के घरांमध्ये टीव्ही होते, तर आता ८० ते ९० टक्के घरांमध्ये टीव्ही सेट्स आले आहेत. उत्तर पूर्व राज्य पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये साधारण ४५ ते ५९ टक्के घरांमध्ये टीव्ही आहेत.

- Advertisement -

दिल्लीमध्ये ९० टक्के घरांमध्ये टीव्ही

उत्तरेकडील राज्यांच्या बाबत दिल्लीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये टीव्ही सेट्स आहेत. तर, जम्मू – काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये साधारण ८० ते ९० टक्के घरांमध्ये टीव्ही पाहिला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -